आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणेंचा 'प्रहार':अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर - नारायण राणे म्हणाले; ''मी बारसूत आंदोलनाच्या ठिकाणी जाणार''

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी जे लोक रडताना पाहिले, तेच लोक प्रवेशासाठी भाजपच्या दारात उभे होते. शरद पवारांचा निर्णय हा वैयक्तिक आहे. मात्र, अजित पवार भाजपच्या सीमारेषेवर आहेत असे वक्तव्य केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले. यासह मी बारसूत प्रकल्पाच्या समर्थनार्थ जाणार अशी स्पष्टोक्ती त्यांनी आज दिली.

रडणारे भाजपच्या वाटेवर होते

शरद पवारांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे की, भावनांचा आदर करून निर्णय घेऊ, त्यावर राणे म्हणाले, राजीनामा मागे घ्यावा यासाठी जे लोक रडताना पाहिले ,तेच लोक प्रवेशासाठी बीजेपीच्या दारात उभे होते. शरद पवारांचा निर्णय हा वैयक्तिक आहे. अजित पवार भाजपमध्ये जाणार का असा प्रश्न उपस्थित केला असता ते सीमारेषेवर आहेत असे राणे म्हणाले, संजय राऊत जे बोलतात ते ते खरे नसते पत्रकाराने त्यांच्या बातम्या दाखवू नये.

उद्धव ठाकरे कोण आहेत?

६ तारखेला उद्धव ठाकरे बारसूत जाणार आहेत, त्याठिकाणी तुम्ही जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता, नारायण राणे म्हणाले, ''मी जाणार असून तो प्रकल्प कोकणामध्ये आला पाहिजे ही माझी भूमिका आहे. मी प्रकल्पाच्या समर्थनार्थ जाणार आहे. १.३० लाख कोटी खर्चून हा प्रकल्प उभारत येत असताना तो येऊ नये म्हणून सांगणारे उद्धव ठाकरे कोण आहेत?

शेतकऱ्यांना ऊसदर मिळत नाही

सोलापुरात बेकारी, विकासाचे काही प्रश्न आहेत का? ते न उपस्थित करता तुम्ही ठाकरेचा प्रश्न उपस्थित करताय यावर ''ते अडीच वर्षे कमवून बसले आहेत. ते बेकार नाही असे राणे म्हणाले.

कोट्यवधी ची उलाढाल होणारे ४४ कारखाने सोलापूर जिल्ह्यात असताना शेतकऱ्यांना ऊस दर मिळत नाही, शेतकरी पिछाडीवर जात असताना उद्योग खाते काय करते? याबाबत विचारले असता उलट राणे यांनी पत्रकारांनी कधी आंदोलन चालवलं का? किती मिळायला पाहिजे याचा अभ्यास केला का?तुम्ही यासंबंधी बाजू घेत नाहीत. ऊस दर कमी मिळतो, म्हणून राज्यात आणि केंद्रात मी प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले.

प्रस्ताव द्या मी लोन मंजूर करुन देतो

या भागातील बँक लघु उद्योजकांना मदत करीत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला असता राणे म्हणाले, बँकेला प्रपोजल आमच्या मार्फत जाते, त्यात ते मंजूर करण्याची लोन मंजूर करण्याची जबाबदारी आमची आहे, तुम्ही प्रस्ताव तर दाखल करा मी मंजूर करून देतो.