आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीने ट्रॅक्टरखरेदीवर घातलेली बंदी उठवली असून शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने ट्रॅक्टर खरेदी करता यावे, यासाठी उत्पादक कंपनीशी करार करत आहोत. तसेच पीएचडी धारकांना अवॉर्ड मिळाल्यापासून फेलोशिप आणि उच्च शिक्षणासाठी व्याज परतावा योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
ट्रॅक्टर खरेदीच्या कर्जाला बंदी
शेतकरी, बेरोजगार मराठा तरूण अणासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्याज परतावा योजनेंतर्गत ट्रॅक्टर खरेदी करतात. शेती मशागत ते धान्य, फळे, पालेभाज्या शेतातून बाजारपेठ आणि ऊस कारखान्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर होतो. मात्र, २०२२ पासून ट्रॅक्टरसाठी कर्ज देणे बंद केले होते. त्यामुळे नवीन ट्रॅक्टर खरेदी आणि शेतकऱ्यांच्या मागणीलाच ब्रेक लागला होता.
कर्ज योजना लागू करणार
डिलर, दलालांनी यातून कमिशन खाल्ले व शेतकऱ्यांना याचा काहीच लाभ मिळाला नाही. त्यामुळे आता ट्रॅक्टर कंपनीशी करार करून सवलतीच्या दरात व्याज परतावा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता येणार आहे. गोरगरीब मराठा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज व पीएचडी धारकांना फेलोशिप देणे, ५५६ लाभार्थींनी एलआयओ न करता अगोदरच कर्ज घेतले होते. त्यांची चुक दुरुस्त करून लाभ देण्यात आले. १० लाखांची कर्ज मर्यादा आता १५ लाख रुपये केली. पुरूष वय कमाल ४५ व महिलांसाठी ५५ वर्षे, दहा हजार ते दोन लाखापर्यंत कर्ज योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पाटील यांनी सांगितले.
बँक ऑफ इंडियाबरोबर करार
महामंडळाच्या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर करार केला जात आहे. मुंबईसह पाच जिल्ह्यात पहिले बँकेचा आम्ही प्रायोगिक तत्वावर अनुभव घेतला. यामध्ये त्यांनी कर्ज देण्यास टाळाटाळ केली नाही. त्यामुळे पुढे उर्वरित महाराष्ट्रात याच बँकेची निवड केली जाणार असल्याचेही पाटील स्पष्ट केले. तर २०२३,२४ च्या अर्थसंकल्पात महामंडळाला ३०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ३० कोटी मिळाल्याचे पाटील म्हणाले.
लाभार्थ्यांचा आलेख
राज्यातील एकूण मंजुर लाभार्थी ५९ हजार ७१३
व्याज परतावा सुरु झालेले लाभार्थी ५४ हजार ११२
कर्ज मंजुर ४१६७ कोटी
व्याज परतावा मिळाला ४१३ कोटी
छत्रपती संभाजीनगर ५ हजार ८२९ लाभार्थी
व्याज परताव्याचे लाभार्थी ५ हजार ३१८
कर्ज मंजूर रक्कम ३९४ कोटी
व्याज परतावा मिळालेली रक्कम ४१ कोटी
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.