आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा:राष्ट्रीय अ‍ॅरोबिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद, खेळाडूंनी पटकावली 18 पदके

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिम्नॅस्टिक्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे गाेपालन स्पोर्टस सेंटर, बंगळुरू (कर्नाटक) येथे नुकत्याच पार पडलेल्या 17 व्या राष्ट्रीय अ‍ॅरोबिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. यात खेळाडूंनी 5 सुवर्ण, 10 रौप्य व 3 कांस्यपदक जिंकले.

या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या डॉ. मकरंद जोशी यांनी तांत्रिक समिती अध्यक्ष म्हणून काम पाहिले. अमेय जोशी, विवेक देशपांडे, डॉ. निलेश जोशी आणि संदीप लटपटे यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. विजेत्या खेळाडूंचे जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. संकर्षण जोशी, सचिव हर्षल मोगरे, डॉ. विशाल देशपांडे आदींनी अभिनंदन केले.

पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

वरिष्ठ गट

साक्षी डोंगरे (महिला एकेरी कांस्य), साक्षी लड्डा व धैर्यशील देशमुख (मिश्र दुहेरी रौप्य), संदेश चिंतलवाड, आर्य शहा व स्मित शहा (मिश्र तिहेरी रौप्य), गौरव जोगदंड, विजय इंगळे, प्रेम बनकर, उदय मधेकर व अभय उंटवाल (सांघिक रौप्य), धैर्यशील देशमुख, साक्षी लड्डा, साक्षी डोंगरे, संदेश चिंतलवाड, सायली वझरकर, विजय इंगळे, उदय मधेकर व अभय उंटवल (एरोडान्स सुवर्ण).

कनिष्ठ गट

अद्वैत वझे (पुरुष एकेरी सुवर्ण), गौरी ब्रह्मने व अनिकेत चौधरी (मिश्र दुहेरी रौप्य), राधा सोनी, विश्वेश पाठक व अनिकेत चौधरी (मिश्र तिहेरी रौप्य), देवेश कातनेश्वकर, अद्वैत वझे, दिपक अर्जुन, पाणिनी देव व रामदेव बिराजदार (सांघिक सुवर्ण).

कनिष्ठ 1 गट

रिया नाफडे (महिला एकेरी रौप्य), आर्यन फुले व पुष्टी अजमेरा (मिश्र दुहेरी रौप्य), गीत भालसिंग, सन्वी सौंदळे व सिद्धी उपरे (मिश्र तिहेरी रौप्य), चिरंजीता भवलकर, अनुश्री गायकवाड, गीत भालसिंग, सन्वी सौंदळे व रिया नाफडे (सांघिक रौप्य).

नॅशनल डेव्हलमेंट गट

सूर्या सौंदळे (पुरुष एकेरी सुवर्ण), सृष्टी खोडके (महिला सुवर्ण), अक्षया कलंत्री व अद्वैत काचेकर (मिश्र दुहेरी रौप्य), अद्वैत काचेकर, अवंतिका सानप व श्वेता राऊत (मिश्र तिहेरी रौप्य).