आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षीय जयेश गातो 195 देशांचे राष्ट्रगीत!:आशिया-इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्डसाठी 6 वर्ष पडतात कमी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकरा वर्षीय विद्यार्थ्याला जर 195 देशांचे राष्ट्रगीत तोंडपाठ आहेत असे जर तुम्हाला सांगितले तर तुम्ही विश्वास ठेवाल का..? नाही न, पण हे वास्तव आहे. पुण्यातील द कल्याणी स्कुलमध्ये इयत्ता सहावीतील जयेश ठोलियाची ही रंजक कथा आहे. त्याला जगात कुणीही स्पर्धक नाहीये. त्यानेच स्वत:चे 7 वेळा रेकॉर्ड मोडले आहेत. आशिया बुक आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने त्याची नोंद घेतली आहे. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची त्याने तयारी केली. पण सहा वर्षांनी वय कमी भरते असे त्याची आई डॉ. ज्योती ठोलियाने म्हटले आहे.

राष्ट्रगीत तोंडपाठ

जयेशचा जन्म 11-11-11 या अनोख्या तारखेला झाला आहे. त्याने 2017 दरम्यान टीव्हीवरून भारत पाकिस्तानचा क्रिकेट सामना पाहिला. नाणेफेक झाल्यानंतर सामना सुरू होण्यापूर्वी त्याने पाकिस्तानचे राष्ट्रगीत ऐकले. पाकिस्तानचे राष्ट्रगीत पर्शियन भाषेतील आहे. जयेशने प्रयत्न केला तर त्याला तोंडपाठ झाले. तत्पूर्वी त्याला फक्त भारताचे राष्ट्रगीत येत होते. त्यानंतर नेपाळ, ऑस्ट्रेलिया, बुरांडी आदी देशांचे राष्ट्रगीत पाठ करून घेतले. त्यावेळी त्याने 30 देशांचे राष्ट्रगीत पाठ करून आशिया आणि इंडिया बुकमध्ये नोंदवले.

स्वतःचेच रिकाॅर्ड मोडले

पुढे त्याचेच रेकॉर्ड मोडण्यासाठी 51 देशानंतर 75, टप्या-टप्याने 100, 120, 150 देशांचे राष्ट्रगीत तोंडपाठ केले. त्याने जगातील साऱ्याच म्हणजे तब्बल 195 देशांचे राष्ट्रगीत पाठ करून घेतले. त्याने 31 ऑक्टोबर 2022 रोजी आशिया बुकमध्ये स्वत:चेच रेकॉर्ड मोडण्यासाठी टिमोर लेस्टे या देशाचे राष्ट्रगीत गायले.

70 देशाचे इंग्रजीतील राष्ट्रगीत सोपे

195 पैकी 70 देशांचे इंग्रजीत राष्ट्रगीत असून ते सोपे होते, असे जयेशचे मत आहे. उर्वरित 125 देशांचे राष्ट्रगीतांची भाषा वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे आपल्याला सर्वच देशांच्या भाषा शिक‌ण्याची इच्छा झाली आहे, असेही त्याने म्हटले आहे. त्याचे वैशिष्ट्ये म्हणजे, अमेरिकेत आत्तापर्यंत झालेल्या 46 राष्ट्राध्यक्षांचे कार्यकाळासह नावेही तो लिलया सांगतो.

जगात शांतता आणि सद्भाव रहावा

आपल्याला अनेक देशांचे निमंत्रण येत आहे. पहिल्यांदा मी भुतानच्या निमंत्रणावरून जाणार आहे. त्यानंतर नमेबिया, न्युगणी आणि नंतर सुदानला जाईल. पर्यटनासाठी मात्र दोन ते तीन देश फिरून आलो आहे. अमेरिकेत दोन वर्षांचे वास्तव्य होते. पृथ्वी वरील सर्व देश समान आहेत. त्यांच्यात सामंजस्य, शांतता, सद्भाव रहावा म्हणून काम करायची इच्छा आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने दखल घ्यावी. परंतु सॉफ्टवेअर इंजिनिअर व्हावे असे जयेश वाटते आहे. वर्ल्ड साँगही त्याने पाठ केले आहे. आईने सिम्बॉयसेसमधून पीएचडी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...