आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहात्मा गांधी मिशनच्या एमजीएम एज्युकेशन अनलिमिटेड या प्रशिक्षण विभागाने एमजीएम विद्यापीठाच्या सहकार्याने ‘लीड द एड-फ्युचर’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 10 आणि 11 जानेवारीला एमजीएम परिसरातील रुख्मिणी सभागृहात ही परिषद होणार आहे.
बारावी पर्यंतच्या शिक्षणाचे विविध पैलू तसेच त्याचा उच्च शिक्षणाशी असणारा संबंध हा विषय या परिषदेचा केंद्रबिंदू असेल, अशी माहिती पत्रकार परिषदेत एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनी दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, संयोजिका डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. नम्रता जाजू उपस्थित होते.
या परिषदेमध्ये 'भविष्यातील शिक्षणाच्या नव्या पद्धती', 'स्टीम एज्युकेशनची कारणे आणि प्रक्रिया', 'ग्रीन स्कुल्सची संकल्पना', 'क्रॉस करिकुलर इंटीग्रेशन', 'शिक्षणातील नैतिकता', 'सीडिंग स्कूल कल्चर', ' लिडरशीप लेसन्स फॉर इन्सपीरेशन अँड अॅक्शन', 'स्कूल आर्किटेक्चर अँड डिझाइन', 'शिक्षणातील तंत्रज्ञानाचा लाभ', 'एज्यू-मार्केटिंग अँड ब्रँड बिल्डिंग' या विषयांवर तज्ञांचे व्याख्यान होतील. तर, 'आपण भविष्यासाठी तयार आहोत का?' आणि 'वेल बेइंग आणि सक्सेस एकमेकांशी निगडित आहेत का?' या दोन विषयांवर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसांत 10 व्याख्याने आणि 3 परिचर्चा होतील. सर्व व्याख्यान 10 आणि 11 जानेवारी 2023 रोजी एमजीएम परिसरातील रुक्मिणी सभागृहात सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत होतील. 10 जानेवारीला सकाळी 9 वाजता उद्घाटन सोहळ्यास आयआयएम, अहमदाबाद इथल्या प्रोफेसर डॉ. निहारिका वोहरा यांचे 'भविष्याचा पुनर्विचार' या विषयावर बीज भाषण होणार आहे. आपल्या भाषणातून त्या शिक्षकांना नवीन युगातील वर्गखोल्यांमधील आव्हानांबद्दल अवगत करून मार्गदर्शन करतील. परिषदेत सध्याची शिक्षण क्षेत्रातील आव्हानं, संधी आणि भविष्यातील शक्यता यावर प्रकाश टाकण्यात येणार असून शाळा संस्कृती, शाळा संकल्पना, शाळा वास्तुशास्त्र, शाळा व्यवस्थापन, बाल आरोग्य, विद्यार्थ्यांची मानसिकता, अभ्यासक्रम अशा विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन आणि विचारमंथन होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.