आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय कराटे स्पर्धा:औरंगाबादच्या खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी; एकूण 42 पदके जिंकली

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बॅडमिंटन हॉल मापसा (गोवा) येथे नुकत्याच 10 वी खुली राष्ट्रीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत एकूण 42 पदके आपल्या नावे केली. यात 16 सुवर्ण, 14 रौप्य व 12 कांस्यपदकांचा समावेश आहे. ही पदके काता व कुमिते या दोन प्रकारात जिंकली आहेत. या स्पर्धेत देशभरातून 1400 पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.

हे सर्व पदक विजेते मिशन मार्शल आर्ट्स अ‍ॅड वुशु कुंग- फु स्पोर्ट्स कराटे असोसिएशन इंडियाचे खेळाडू आहेत. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विजेत्या खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक पवन घुगे, सचिव प्रविण घुगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. यशस्वी खेळाडूंचे राम बुधवंत, नंदा घुगे, श्याम बुधवंत, राधा घुगे, विश्वनाथ घुगे, राम चौरे, ओमकार वाघ, नीलेश पाटील आणि कोमल राठोड आदींनी अभिनंदन केले.

खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली

या राष्ट्रीय स्पर्धेत आमच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे. त्यांनी केलेल्या कठोर मेहनतीचे हे फळ आहे. काही सुवर्णपदके थोड्यात हुकली. अन्यथा सुवर्णपदकांचा आकडा आणखी वाढला असता. युवा खेळाडूंना या स्पर्धेतून खुप काही शिकायला मिळाले आहे, असे प्रशिक्षक पवन घुगे यांनी सांगितले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

मुली - अनुश्री घुगे, सायली गोरे (सुवर्ण), प्रियांशी जांगिड (2 सुवर्ण), साक्षी काळवणे, शौर्या मोरे, अंकिता मेने (सुवर्ण व रौप्य), स्वरा कुलकर्णी, आर्या मुळे (सुवर्ण व कांस्य), तनुश्री घुगे, समिक्षा पुजारी (रौप्य), मनस्वी गावंडे, वेदिक तोरमड (रौप्य व कांस्य), एम.सेंथामराई (रौप्य पदक), जियांशी ठाकर आणि कोमल पारवे (2 कांस्य).

मुले - यशोधन घुगे, अद्वैत गावंडे (2 सुवर्ण), मल्हार कुलकर्णी, अभिनव तिडके (सुवर्ण व रौप्य), रुद्र चव्हाण (सुवर्ण व कांस्य), अभिजित देशमुख, श्रेयस मामिलवाड (रौप्य व कांस्य), गजराज जाट (कांस्य व रौप्य) आणि कुणाल लाड (रौप्य).

बातम्या आणखी आहेत...