आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय नेटबॉल महासंघ व महाराष्ट्र अँम्युचअर नेटबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे 40 वी वरिष्ठ राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत २२ राज्यातील संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदक आपल्या खात्यात जमा केले. छत्रपती संभाजीनगरचा अनुभवी राष्ट्रीय खेळाडू अनिल वाघमारेने विजयी महाराष्ट्राचे नेतृत्व केले.
दुसरीकडे मुलीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरी पर्यंत मजल मारली. महाराष्ट्राच्या मुलीच्या संघाला उपांत्यपूर्व सामन्यात कर्नाटक संघाकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. छत्रपती संभाजीनगरची अनुभवी राष्ट्रीय खेळाडू स्तुती पाटोळे उत्कृष्ठ प्रदर्शन केले. संघाच्या यशाबद्दल महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष बिपिन कामदार, सचिव डॉ. ललित जिवाणी, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, पंकज भारसाखळे, सुनिल डावकर, सतीश इंगळे आदींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राने केरळला बरोबरीत रोखले :
या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने गुजरातचा २७-४३, उत्तराखंडचा ४१-०७, मध्यप्रदेशचा ४८-३६, पंजाबचा ४५-३६ असा पराभव केला, तर दिल्ली विरुद्ध झालेल्या अतितटीच्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्राला ४४-४१ गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. तृतीय क्रमांकासाठीची लढत केरळ विरुद्ध महाराष्ट्र याच्यांत झाली. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक राहिल्यानंतर ५३-५३ गुणानी बरोबरीत सुटला. त्यामुळे दोन्ही संघाना तृतीय पारितोषिक विभागून देण्यात आले.
महाराष्ट्र नेटबॉल संघ पुढीलप्रमाणे
पुरुष – अनिल वाघमारे (कर्णधार), अविनाश पाटील, गौरव भुरे, अनिकेत देशमुख, रितेश शेंडे, अनुज कामटे, प्रशांत जाधव, चंदन गायकवाड, आकाश पवार, वैभव ताटे, सिद्धांत पाटील, वैभव ढगे.
महिला – रुपाली भावनाकार (कर्णधार), स्तुती पाटोळे, अश्विनी तटकांतीवर, निशा यादव, श्रावणी सांब्रेकर, शिल्पा तरारे, यामिनी याडक, वैष्णवी गोरे, प्रतीक्षा सोनकांबळे, यशोदा सोनखासकर, मुस्कान शेख यांचा समावेश होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.