आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजापल्लम (तामिळनाडू) येथे नुकतीच 19 व्या राष्ट्रीय सिलंबम स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या नावे केले. संघाने एकूण 67 पदके जिंकली. यात 5 सुवर्ण, 28 रौप्य आणि 34 कांस्यपदके मिळवत राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा कायम ठेवला. संघाच्या यशात छत्रपती संभाजीनगरच्या खेळाडूंनी महत्वाचे योगदान दिले. स्पर्धेत 22 राज्यातील एकूण 2500 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता.
सिलंंबम हा खेळ भारतीय शिवकालीन युद्ध कलेवर आधारित असलेला खेळ आहे. यामध्ये लाठीकाठी, तलवारबाजी, भाला चालवणे, सुरुल इत्यादी क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. या खेळाचा शालेय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आला. महाराष्ट्राच्या संघाला मुख्य प्रशिक्षक कुंडलिक कचाले यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून नाझिम शेख यांनी काम पाहिले. विजेत्या खेळाडूंचे राज्य संघटनेचे अध्यक्ष पी.वाय. आत्तार, सचिव एस.डी. गायकवाड, बाळा साठे, केशव मंगरुळे, श्रीधर कांबळे आदींनी अभिनंदन केले.
पदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
सुवर्ण -श्रीपादराज रायरीकर, समर्थक वर्धेकर, वैष्णवी मानकर, ईश्वरी कदम, संजना हिवरकर. रौप्यपदक - ओजस जांभे, अथांग मुजुमले, सृजन लंके, लोकेश देवकर, राजवीर सुतार, क्षितिज घाटगे, व्यंकटेश चव्हाण, मल्हार केळकर, प्रणव पांढरे, ओम संगपुल्लम, मोहक बर्वे, विहान निकम, मनवा कुलकर्णी, स्वरा महिंद्रकर, मिरा बिडकर, प्रांजल कापसे, शांभवी सिवासने, ज्ञानेश्वरी मोरे, सई साळुंखे, अनन्या लावंड, साक्षी सोंडकर, सेजल गालिंदे, जान्हवी दुबे, मानसी भिसे, ऋतु नन्होरया, निहारिका नाईक, ब्रम्हाक्षी मस्के, पायल खैरकर.
कांस्यपदक प्राप्त खेळाडू
युवराज डेंगळे, मेघ पाटील, अद्वैत बनकर, हर्षित सुराणा, एस. यादव, ओजस पाठक, देवांश चव्हाण, साईराज इंगुळकर, अनिरुद्ध पिटके, शौर्य काकडे, दर्श भुजबळ, हर्षद जन्नु, सिद्धेश गालिंदे, वरद मराठे, सोमेश्वर बर्डे, भूषण बोडके, तन्मय पोटे, करण जोशी, भार्गव जोशी, सोहम खवनकर, ओम राठोड, सोहम घोडके, आदित्य रवनंग, आर्यन रुपवदे, शिवराज गावडे, चिन्मयी कुलकर्णी, अन्वी मेढेकर, आनंदी तनपुरे, सप्तश्री तिसगे, तन्वी रोकडे, हर्षदा चव्हाण, रश्मी कुमार, वेदश्री उदगिरकर, माही कांक्रेजा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.