आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट््स अॅथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी (गोवा) येथे पार पडलेल्या 13 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेत महिला गटात महाराष्ट्राच्या संघाने विजेतेपद पटकावले. पंजाब संघाने रौप्य व केरळने कांस्यपदक मिळवले. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या पुरूष संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. छत्तीसगडने सुवर्ण व आंध्रप्रदेशने कांस्यपदक मिळवले.
महाराष्ट्राच्या संघाच्या विजयात छत्रपती संभाजीनगरचे खेळाडू संतोष अवचार व ईश्वरी शिंदे यांनी मोलाचे योगदान दिले. पुरुष संघाच्या फायनलमध्ये छत्तीसगड संघाने महाराष्ट्रावर २-१ ने मात करत जेतेपद मिळवले. दुसरीकडे महिला गटात महाराष्ट्राने पंजाबला ४-१ ने हरवत अजिंक्यपद पटकावले. विजेत्या संघाकडून करिष्मा कुडचे, विनिता पाटीलने प्रत्येकी एक होमरन काढला. विजेत्या संघांना भारतीय सॉफ्टबॉल महासंघाच्या अध्यक्षा नितल नारंग, सचिव एल. आर. मौर्य, प्रवीण अनावकर, श्रीकांत थोरात यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
महाराष्ट्राचे विजेते संघ पुढीलप्रमाणे :
महिला संघ - ऐश्वर्या बोडखे, ईश्वरी शिंदे, हर्षदा कासार, प्रीती कांबळे, ऐश्वर्या पुरी, करिष्मा कुडाचे, स्वप्नाली वायदंडे, प्रिया सूर्यवंशी, शिवानी देशमुख, उर्वशी सनेश्वर, नेहा देशमुख, सई देशमुख, मोनाली नातू, विनिता पाटील, श्रद्धा जाधव आणि कोमल तायडे.
पुरुष संघ - प्रितेश पाटील, संतोष आवचार, सुमेध तळवेलकर, जयेश मोरे, धीरज बाविस्कर, राज भिलारे, स्वप्नील गदादे, गौरव चौधरी, प्रतीक डुकरे, ऋत्विल फाटे, शिरूतम शर्मा, राजेश भट, ऋषभ जिद्दवार, वैभव मुटे, वैभव वाघमारे आणि कुणाल लोणारे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.