आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागोवा सॉफ्टबॉल असोसिएशन व स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवा आणि भारतीय सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पणजी (गोवा) येथे सुरु असलेल्या 13 व्या वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष-महिला फेडरेशन कप सॉफ्टबॉल स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली.
पहिल्या दिवसाच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्र पुरुष संघाने विजयी सलामी देऊन स्पर्धेत आपले वर्चस्व निर्माण केले, तर महाराष्ट्र महिलांच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
स्पर्धेचे उदघाटन गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पार पडले. या वेळी भारतीय सॉफ्टबॉल संघटनेचे सीईओ प्रवीण अनावकर, श्रीकांत थोरात, लक्ष्मण गहलोत यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत देशभरातील 35 संघांनी सहभाग नोंदवला आहे.
महाराष्ट्राने मध्य प्रदेश संघाला हरवले
पुरुषांच्या गटामध्ये झालेल्या आज पहिला बाद फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र पुरुष संघाने मध्यप्रदेश या संघाला 3-0 होमरण च्या फरकाने एकतर्फी नमवले. या सामन्यात महाराष्ट्राच्या उत्कृष्ट पिचर गौरव चौधरी याने भेदक पिचिंग करत सोबत एक होमरण ही मारला. महाराष्ट्राचा घातक पिचिंग पुढे मध्य प्रदेशला लढतीत एकही रन काढता आला नाही. तसेच जयेश मोरे, ऋतिक फाटे यांनी उत्कृष्ट खेळी करत आपल्या संघाना विजय प्राप्त करुन देणाऱ्यात महत्वाचे योगदान दिले.
महिलांत महाराष्ट्रला पंजाबने नमवले
दुसरीकडे, महिला गटात महाराष्ट्राच्या संघाला रोमांचक लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. तगड्या पंजाब संघाने महाराष्ट्राच्या महिलांना 2-1 होमरनांनी पराभूत केले. या दोन्ही संघाना गोकुळ तांदळे, दीपक रुईकर, प्रसेनजित बनसोडे, गणेश बेटूदे, ऐश्वर्या भास्करण, पूजा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभत आहे. आज झालेल्या सामन्यांसाठी पंच म्हणून जुगलकीशोर शर्मा, मुकुल देशपांडे, विकास वानखेडे, सुयोग कल्पेकर, शेषणाग, प्रसन्न पळनिटकर यांनी काम पहिले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.