आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन व दिल्ली संघटनेच्या वतीने 24 व्या राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेचे 5 ते 7 जानेवारीदरम्यान दिल्ली येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या वतीने 14 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ सेलू येथून मंगळवारी रवाना झाला आहे. संघात परभणीच्या खेळाडूंच्या सर्वाधिक वर्णी लागली.
फ्रेन्डस क्लब सेलू व परभणी जिल्हा असोसिएशनच्या वतीने सेलू येथे घेण्यात आलेल्या राज्य संघ निवड चाचणी स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केल्याने त्यांना संघात निवड करण्यात आली आहे.
छलानींकडून खेळाडूंना किट भेट
महाराष्ट्राच्या मुलामुलींच्या संघातील खेळाडूंना संजय छलानी व सी.टी. पारिख यांच्यातर्फे किट व ट्रकसुट भेट देण्यात आले. या प्रसंगी फ्रेंड्स क्लबचे अध्यक्ष चंद्रकांत बोराडे, जिल्हा कार्याध्यक्ष विनोद बोराडे, ओमप्रकाश तोष्णीवाल, संघटनेचे राज्य चिटणीस गणेश माळवे, गणेश बोराडे, राजेश गुप्ता, प्रा. नागेश कान्हेकर, जुगलकिशोर बाहेती, मधुसूदन बोराडे, दादासाहेब बोराडे, रवि कुलकर्णी, नंदलाल परताणी, निजलिंग तरवडगे, शिवाजी फोफसे यांची उपस्थिती होती.
संघ पहिल्या तीन मध्ये राहणार
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची चांगली तयारी झाली आहे. संघात युवा खेळाडूंचा समावेश आहे. आपले दोन्ही संघ पहिल्या तीनमध्ये राहिल, असा विश्वास राज्य संघटनेचे सचिव गणेश माळवे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र संघ पुढील प्रमाणे
पुरुष - प्रफुल्ल कुमार बन्सोड (पुणे), असिफ मुल्लानी (सांगली), कमलेश नावाडे, सिध्दार्थ लिपने (परभणी), राहुल पेटकर (लातूर), निनाद राहाटी (मुंबई).
महिला संघ - संध्या शिंदे, रेवती कोकाटे (अकोला), पार्वती दुधाटे, साक्षी गोसावी, राणी दुधाटे (परभणी), रिद्धी खराटे (नाशिक). मिश्र दुहेरी संघ - चैतन्य नावाडे व मनिषा चंदावरकर (परभणी). संघ प्रशिक्षक सतिश नावाडे व संघ व्यवस्थापक गजानन शिंदे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.