आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:‘जितो कनेक्ट’ मध्ये राष्ट्रीय व्यापार परिषदेचे पुण्यात आयोजन

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितो पुणेच्या वतीने ६ ते ८ मे दरम्यान आयोजित केलेल्या ‘जितो कनेक्ट’२०२२ आंतरराष्ट्रीय परिषद व ट्रेड फेअर मध्ये राष्ट्रीय व्यापार महापरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सात मे राेजी ही परिषद होणार असून यास केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, नीती आयोगाचे सीईआे अमिताभ कांत व नॅशनल रेनफेड एरिआ अॅथॅारीटीचे सीईआे अशोक दलवाई उपस्थित राहणार आहे अशी माहिती पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळिया यांनी दिली आहे.

या परिषदेत व्यापार क्षेत्रातील भविष्यातील संधी विषयी सविस्तर चर्चा होईल. देशभरातील व्यापारी उपस्थित असणार आहे. पुढील काळात देशाचे धाेरण कशाप्रकारे असेल आणि केंद्र सरकारची व्यापारासंबंधीची दिशा समजण्यास या परिषदेमुळे मदत होईल, असे आयोजकांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...