आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिळकांचे नातू कुणाल टिळक यांचा आरोप:राष्ट्रवादी काँग्रेस ब्राम्हणद्वेष नि​​​​​​​र्माण करतेय, राज यांच्या वक्तव्याचाही घेतला समाचार

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस द्वेष निर्माण करीत आहे. महापुरुषांना राजकारणात ओढले जात आहे. हा अजेंडा येत्या काही वर्षांत पुढे आला आहे. टिळकांच्या आयुष्यातील प्रत्येक बाब आमच्या अर्काईव्हमध्ये आहे, हे पुरावे कुणीही घेऊन जावे आणि खात्री करावी अशी स्पष्टोक्ती लोकमान्य टिळक यांचे नातू कुणाल टिळक यांनी दिली.

याच बरोबर त्यांनी राज ठाकरे यांच्या टिळकांबद्दलच्या वक्तव्याचा समाचारही घेतला. राज आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटबद्दल कुणाल टिळक यांनी या विषयावर आपली सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली.

राज यांच्या वक्तव्यामुळे टिळकांच्या कार्याचा अपमान

जितेंद्र आव्हाडाच्या वक्तव्यावर आमचा आक्षेप नाही, राज ठाकरेंच्या एका विधानामुळे सर्व सोशल माध्यमांत टिळकांच्या नावाची खिल्ली उडवली जात आहे. त्यांच्या कार्याचा अपमान होत आहे असे कुणाल टिळक म्हणाले.

रायगड स्वराज्य समितीसाठी टिळकांचा पुढाकार

रायगड स्वराज्य समिती स्थापन केली त्यात टिळकांचा पुढाकार मोठा होता. महाराजांच्या वंशजांना आणि संस्थानिकांना टिळकांनी पत्र लिहित शिवरायांच्या समाधी विकासाबाबत समन्वय घडवला. जिर्णोद्धार समितीत टिळक होते. ​त्यांनी पैसे गोळा करण्याबाबत सांगितले होते. शिवजयंतीचा उत्सव टिळकांच्या पुढाकाराने झाला. त्याला ब्रिटीशांनी परवानगी नाकारली होती पण टिळकांनी ​​​​​​ब्रिटींशांची परवानगी मिळवली आणि 15 मार्च 1896 ला शिवजयंतीचा उत्सव साजरा झाला.

टिळकांबद्दल नकारात्मक चर्चा थांबवावी

राज ठाकरेंचा दुसरा मुद्दा नव्हता त्यांनी एक विधान केले त्यात काही गैर आहे असे मी म्हणत नाही पण लोकमान्य टिळकांचा त्या विधानामुळे नकारात्मक चर्चा होत असेल आणि त्यात टिळकांची बदनामी होत असेल तर हा विषय संपवावा असेही ते म्हणाले.

स्मारकाचा निधी टिळकांनी डेक्कन बॅंकेत जमा केला होता

फंडचे पैसे लोकमान्य टिळकांनी गोळा केले ते पैसे पुण्यातील डेक्कन बॅंकेत जमा केले होते त्याची माहिती केसरीच्या माध्यमातून लोकांनाही सांगितले होते. पण नंतर डेक्कन बॅंक दिवाळखोरीत गेली. टिळाकांनी बँक व्यवस्थापनाला विनंतीही केली होती की पैसे परत द्या पण ते मिळाले नव्हते हेही लक्षात घ्यायला हवे असेही ते म्हणाले.

टिळकांचे कार्य महत्वाचे

मी आव्हाड यांची मी मुलाखत बघितली पण ते एकही विट रचली गेली नाही असे ते म्हणत असतील तरीही महाराजांच्या सर्व वारसदार आणि संस्थानिकांत समन्वय घडवून आणला होता. त्यांनी जाहीर सभा घेत महाराजांच्या कार्याची आणि अखंड भारताबद्दलचा संदेश राष्ट्रीय स्तरावर पोहचवला हे टिळकांचे कार्य महत्वाचे नाही का? असा सवालही कुणाल टिळक यांनी केला.

राष्ट्रवादी ब्राम्हण समाजाबाबत द्वेष निर्माण करीत आहे

ब्राम्हण समाजाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस द्वेष नि​​​​​​​र्माण करीत आहे. टिळकांच्या आयुष्यातील प्रत्येक बाब आमच्या अर्काईव्हमध्ये आहे ती कुणीही घेऊन जावी आणि खात्री करावी. महापुरुषांना राजकारणात ओढले जात आहे. हा अजेंडा येत्या काही वर्षांत पुढे आला आहे म्हणूनच मी म्हणतो की, पुराव्यानिशी बोलावे. ब्राम्हण विरुद्ध मराठा हा विषय वेगळा आहे. इथे तुम्ही देशाच्या महापूरुषाचे नाव घेत समाजात तेढ निर्माण करणे योग्य नाही असेही कुणाल टिळक म्हणाले.

काय म्हणाले होते आव्हाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते कि लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.​​​​​​​

बातम्या आणखी आहेत...