आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्यमंत्र्यांनी जोडले हात:गर्दी न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन! शासकिय विश्रामगृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कोरोना नियमांची पायमल्ली

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोलीच्या शासकीय विश्रामगृहात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या स्वागतासाठी आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली. गर्दी कमी करण्यासाठी मंत्री टोपे यांनी हातही जोडले, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याठिकाणी कार्यकर्त्यांनी मंत्र्यांसमोरच कोरोनाच्या नियमाची पायमल्ली केल्याचे दिसून आले.हिंगोली येथील कार्यक्रमांसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे आज दुपारी हिंगोलीत दाखल झाले आहे. दरम्यान, शासकीय विश्रामगृहावर येण्यापूर्वीच कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

आरोग्यमंत्री टोपे शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर एका कक्षामध्ये त्यांच्या सत्कारासाठी व स्वागतासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्कारासाठी आलेले कार्यकर्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांचेही एकत नव्हते. राज्यात एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता खुद्द टोपे यांनीच काही दिवसापूर्वी बोलून दाखवली होती. त्यासाठी कोरोनाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र हिंगोलीत त्यांच्याच सत्कार सोहळ्यात कोरोना नियमाची पायमल्ली झाली आहे.

दरम्यान, आरोग्यमंत्री टोपे यांनी कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याबाबत हात जोडून विनंती केली. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजूला केले. आरोग्य मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीची मात्र जिल्हाभरात चांगली चर्चा सुरू झाली.

बातम्या आणखी आहेत...