आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:एमआयएमसह राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाच्या प्रस्थापितांचे वॉर्ड फुटल्याने बसणार फटका

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एमआयएमचे दोन माजी विरोधी पक्षनेते, एक गटनेता तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे वॉर्ड विविध प्रभागांत विभागल्याने आगामी निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसू शकतो. मनपाच्या प्रभाग रचनेच्या आराखड्यात मुस्लिमबहुल भागातील अनेक वॉर्ड हडको, सिडको, हर्सूल, नंदनवन कॉलनी, गारखेडा परिसर, नक्षत्रवाडी आदी भागांशी जोडला गेल्याने जुन्या वॉर्डांची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे इच्छुकांना येणारी निवडणूक लढणे अवघड जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार एमआयएमचे माजी गटनेते नासेर सिद्दिकी यांचा वॉर्ड गणेश कॉलनी, हिनानगर होता. आता तो तोडून हडको, स्वामी विवेकानंदनगर, भारतनगर, रोजाबागपर्यंत नेला. तसेच, फेरोज खान यांचा वॉर्ड पूर्वी नवाबपुरा होता. तो राजाबाजार, पैठण गेट ते औरंगपुर्यापर्यंत वाढवला आहे. अज्जू नाईकवाडींचा वॉर्ड आविष्कार कॉलनी होता. तो आता तोडून एन-६ सिडको, गणेशनगर, अयोध्यानगर, गुलमोहर कॉलनी ते हडकोपर्यंत जोडला आहे. संगीता वाघुले यांचा पूर्वी मिसारवाडी वॉर्ड होता. तो दोन भागांमध्ये तोडून एन-१ सिडकोपर्यंत तसेच अर्धा भाग आंबेडकरनगर, नारेगावपर्यंत वाढवला आहे. सलिमा बाबू कुरेशी यांचा इंदिरानगर, गारखेडा वॉर्ड ताेडून शहानूरवाडी, गारखेडा परिसरपर्यंत जोडण्यात आला आहे. माजी विरोधी पक्षनेत्या सरिता बोर्डे यांचा कोकणवाडी, उस्मानपुरा वॉर्ड क्रांती चौक ते पीरबाजारपर्यंत तर काही भाग कबीरनगरला जोडला आहे. समीना शेख यांचा सुराणानगर वॉर्ड इंदिरानगर, बायजीपुरा, दुसरा भाग संजयनगर, भवानी नगरपर्यंत जोडला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष खाजा शरफोद्दीन यांचा सिल्कमिल कॉलनी वॉर्ड दोन भागांमध्ये विभागला आहे. त्यापैकी एक भाग उस्मानपुरा, पीरबाजार, तर दुसरा भाग महानुभाव आश्रमापर्यंत जोडला आहे. काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल नवीन यांचा सादातनगर वॉर्ड नक्षत्रवाडी ते ईटखेड्यापर्यंत जोडला आहे.

वॉर्डातील समीकरण शहरातील तीन विधानसभा क्षेत्रांत एमआयएमचे २५, राष्ट्रवादीचे चारपैकी दोन मुस्लिम, काँग्रेसचे ११ नगरसेवक आहेत. त्यापैकी सात मुस्लिम नगरसेवक आहेत. नव्या प्रभागातील बदल पाहिले तर मध्य विधानसभा क्षेत्रात सात प्रभाग व २१ नगरसेवक, पूर्व विधानसभा मतदारसंघातील ४ प्रभागात १२ नगरसेवक आहेत. पश्चिम मतदारसंघात तीन वॉर्डांत मुस्लिम मतदारांचे प्राबल्य आहे. सध्या मध्य विधानसभा क्षेत्रात एमआयएमचे १३, पूर्वमध्ये ११, पश्चिममध्ये दोन नगरसेवक आहेत.

आयोगाकडे तक्रार करू ^नकाशावर ए बी इलेक्शन ब्लॉक, पॉप्युलेशन ब्लॉक, त्याचा क्रमांक व मतदार संख्येचा उल्लेख करणे बंधनकारक आहे. तसे न करता ते नकाशे जाहीर करण्यात आले आहेत. मनपाच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक सत्ताधारी शिवसेनेला मदत करण्याच्या उद्देशाने असे कृत्य केले आहे. त्याविरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करू. - शेख अहमद, एमआयएम

बातम्या आणखी आहेत...