आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडा, असे जाहीर आवाहन आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केली आहे. तसेच, सत्तारांचे कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षीस देण्याचेही जाहीर केले आहे.
कार्यकर्ते रस्त्यावर
सुप्रिया सुळे यांच्यावरील टीकेमुळे अब्दुल सत्तारांविरोधात राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आक्रमकपणे आंदोलने करण्यात येत आहे. आता हा वाद दिवसेंदिवस चिघळताना दिसत आहे. राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा रेखा तौर यांनी तर अब्दुल सत्तारांचे कपडे फाडून त्यांना धडा शिकवा, असे आवाहन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
जिथे दिसतील तिथे कपडे फाडा
रेखा तौर म्हणाल्या, कृषिमंत्री अब्दुल सत्तार महाराष्ट्रात जिथे दौऱ्यावर असतील तिथे त्यांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कपडे फाडावे. कपडे फाडणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस माझ्याकडून देण्यात येईल. अब्दुल सत्तार यांनी आपल्या बेताल वक्तव्याने केवळ सुप्रिया सुळे यांचाच नव्हे तर राज्यातील सर्वच महिलांचा अपमान केला आहे.
सत्तारांची माफी नको
रेखा तौर म्हणाल्या, 50 खोके देऊन हे सरकार ओरबाडून जनतेच्या माथी मारण्यात आले आहे. अब्दुल सत्तार सुप्रिया सुळे यांना म्हणतात की, तुम्हाला खोके देऊ. मात्र, सुप्रिया सुळे या अब्दुल सत्तार यांच्या सात पिढ्या विकत घेऊ शकतात. एवढ्या गलिच्छ शब्दांत टीका करुनही अब्दुल सत्तार म्हणतात की, कोणाच मन दुखावल असल तर माफी मागतो. पण, आम्हाला सत्तार यांची माफी नको. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा.
सत्तार नॉट रिचेबल
सुप्रिया सुळेंबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पहिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सत्तारांचे कान टोचले आहेत. त्यानंतर कालपासून सत्तार नॉट रिचेबल आहेत. तर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी केली आहे. सुप्रिया सुळेंवर टीका करताना सत्तारांची जीभ कशी झडली नाही, असा समाचार ठाकरेंनी घेतला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.