आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा विळखा:राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, निवासस्थानाजवळचा परिसर सील

परभणी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परभणी येथील राज्यसभा खासदार फौजिया खान यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. फौजिया खान यांची कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाजवळचा परिसर सील करण्यात आला आहे. यासोबतच, त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांचीही तपासणी केली जाणार असल्याचे परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले आहे. दरम्यान अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्या आहे. आता राष्ट्रवादीचे परभणी जिल्ह्याध्यक्ष आणि आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्यापाठोपाठ येथील खासदारही कोरोनाच्या विळख्यात सापडल्या आहेत. 

63 वर्षीय फौजिया खान या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. मार्च महिन्यामध्ये त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्रात आघाडी सरकारच्या काळात त्यांच्याकडे शालेय शिक्षण, महिला आणि बाल कल्याण, राज्यमंत्रीपद होते. फौजिया खान याआधी दोन वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सदस्यही होत्या.

दरम्यान परभणीचे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर खासदार फौजिया खान यांच्याविषयी माहिती दिली,  के म्हणाले की, परभणी येथील नांदखेडा रोड येथे फौजिया खान यांचे निवासस्थान आहे. निवासस्थानी असतानाच त्यांना कोरोना व्हायरस लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तिंची कोरोना चाचणी केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, खान यांच्या घरासह नजिकचा परिसरही सील करण्यात आला आहे.