आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात गंगापुरात राष्ट्रवादीची निदर्शने

गंगापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील काल पैठणमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गंगापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. तालुका अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, माजी नगराध्यक्ष संजय जाधव, शिवाजी बनकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी विजय वरकड, अहेमद पटेल, सुरेश नेमाडे, विश्वजित चव्हाण, वाल्मीक सिरसाट, अमोल जगताप यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...