आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफिसवर निदर्शने:वेदांता फाॅक्सकाॅनप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची कलेक्टर ऑफिसवर निदर्शने

औरंगाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नुकतीच राज्य सरकारविरोधात निदर्शने करण्यात आली. या वेळी ‘गुजरात तुपासी, महाराष्ट्र उपाशी’, ‘५० खोके, महाराष्ट्राला धोके’ आदी घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर तासभर दणाणून सोडला होता. यापूर्वी काँग्रेस-शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारवर टीका केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीनेदेखील सरकारविरोधात हल्लाबोल केला आहे.

या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मयूर सोनवणे म्हणाले की, शिंदे व भाजप सरकारच्या दुर्लक्षामुळे हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे राज्यातील एक लाख युवकांचा रोजगार बुडाला आहे. मोदी यांच्यासमोर राज्यातील भाजप सरकार काहीही बोलू शकत नाही. त्यामुळे राज्यातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी औरंगाबादेत आढावा बैठक घेतली होती. यात युवकांना राज्य सरकारविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीने हे आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...