आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अग्निपथ'विरोधात आंदोलन:औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसची निदर्शने, पोलिस बंदोबस्त तैनात

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने सैन्य भरती प्रक्रियेसाठी अग्निपथ योजना आणली आहे. या योजनेच्या निषेधार्थ शहरातील क्रांती चौक येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी सैन्यदलातील रेजिमेंट व्यवस्थेला बाधक असल्याने योजना त्वरित बंद करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

जोरदार घोषणाबाजी

केंद्र शासनाने सैन्यदलातील भरती नवीन अग्निपथ योजना आणली आहे. या योजनेला देशभरातून विरोध होत आहे. अग्निपथ योजनेला विरोध होत असताना अनेक राज्यांमध्ये हिंसक वळण मिळाले होते. अग्निपथ योजनेच्या विरोधात औरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे 20 जून रोजी क्रांती चौक येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी देत निषेध व्यक्त करण्यात आला.

पोलिस बंदोबस्त तैनात

अग्निपथमुळे सैन्य दलातील विविध रेजिमेंटच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. त्यामुळे अग्निपथ योजना देशाच्या एकात्मतेला बाधक आहे. त्यामुळे ही योजना त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. इतर राज्यांची परिस्थिती पाहता क्रांती चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. मयूर सोनवणे, कार्याध्यक्ष कयूम शेख, विशाल विराळे, ऋषिकेश खैरे, जुबेर खान, नवीन खान, अलीम शेख, सचिन उसरे, आयान पटेल यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...