आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:ईडी कारवाई विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन ; केंद्र सरकार रडीचा डाव खेळत आहे

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारकडून होणाऱ्या ईडीच्या कारवाईच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सोमवारी क्रांती चौकात आंदोलन केले. शहराध्यक्ष मयूर सोनवणे, प्रदेश सचिव अक्षय पाटील, कार्याध्यक्ष कय्युम शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार रडीचा डाव खेळत असून जाणूनबुजून विरोधी नेत्यांना ईडीच्या माध्यमातून धमकावण्याचा प्रयत्न चालू आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. या वेळी पूर्व विधानसभा अध्यक्ष विशाल विराळे, पश्चिम अध्यक्ष ऋषी खैरे, मध्य विधानसभा अध्यक्ष जुबेर खान, राम पंडित, पाशा अन्सारी, दिनेश नवगिरे, सचिन उसरे, दादासाहेब फल्ले, हेमंत देशमुख, संदीप शिरसाट, अयान पटेल, वसीम मणियार, मिलिंद जमदाडे, शुभम खेत्रे, सौरभ मगरे, सुफियान बागवान, सुशील अंभोरे, फिरोज पठाण उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...