आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णांना लाभ:इस्लामिक रिसर्च सेंटरच्या बुढीलेन चॅरिटेबल रुग्णालयातून 1200 मुलांचे नेब्युलायझेशन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामिक रिसर्च सेंटरतर्फे बुढीलेन, कबाडीपुरा येथे २७ ऑक्टोबर रोजी चॅरिटेबल रुग्णालय सुरू केले. त्यानिमित्त घाटीतील अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी रुग्णालयास भेट देत माहिती घेतली. त्यांच्याच हस्ते फीत कापून रुग्णालयाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास राठोड, डॉ. सिराज बेग, अॅड. सय्यद फैज, शब्बीर अहमद, ख्वाजा अलिमोद्दीन यांची उपस्थिती होती. २७ ऑक्टोबर ते १५ डिसेंबरपर्यंत १ हजार ८९६ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधी दिली.

अॅनिमियाग्रस्त महिला, फंगल इन्फेक्शनचे रुग्ण अधिक : बुढीलेन परिसरातील अनेक महिलांमध्ये अॅनिमिया असल्याचे आढळले, तर फंगल इन्फेक्शन रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. त्वचासंबंधी औषधी महाग असतात, पण ती औषधी मोफत असल्याने अनेक जण याचा लाभ घेत आहेत.

१२०० मुलांचे मोफत नेब्युलायझेशन : आतापर्यंत १२०० मुलांचे मोफत नेब्युलायझेशन केल्याचे डॉ. ताबीश सय्यद म्हणाले. मागच्या महिन्यात सर्दी, खोकला प्रचंड वाढला होता. औषधी तसेच नेब्युलायझेशन मोफत असल्याने पालकांना सोयीचे झाले आहे. दररोज ७५ पेक्षा अधिक रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. दीड महिन्यात दोन टायफॉइड, दोन काविळीचे रुग्णांवर उपचार केल्याने ते ठणठणीत आहेत.

गरजूंची मोफत तपासणी आयआरसीचे संस्थापक अध्यक्ष अॅड. फैज सय्यद म्हणाले, रुग्णांसाठी अत्यल्प तपासणी फी ठेवली आहे. परंतु ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा रुग्णांची मोफत तपासणी करून औषधी दिली जाते.

शहरात ६ ठिकाणी रुग्णालये शहरातील बायजीपुरा, अंबर हिल, शाहबाजार, शहानूरमियाँ दर्गा, बुढीलेन, मिसारवाडी येथे दररोज सकाळी ९ ते २ व संध्याकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सुविधा दिली जाते.

बातम्या आणखी आहेत...