आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर असल्यामुळे एका विशिष्ट समाजातील व्यक्तींचा नाही तर सर्वच समाजाचा विकास झाला. आज अनुसूचित जातींच्या व्यक्ती शासनाच्या उच्च अधिकारीपदी आहेत. अशा प्रकारच्या व्यक्तींमुळे समाज बदलतो. त्यासाठी समाजात त्यागी व्यक्ती असण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार यांनी व्यक्त केले.
बळवंत वराळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीच्या सभागृहात विशेष गौरव सोहळा, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मालती वराळे, प्रमुख पाहुणे आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र व साधने प्रकाशन समितीचे सदस्य योगिराज बागूल, गौरवमूर्ती आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी नम्रता फलके, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या चंद्रकला शेजवळ यांची उपस्थिती होती.
या वळी बागूल म्हणाले की, डॉ. बाबासाहेब हे अभ्यासाचे नाही तर जगण्याचा विषय आहेत. ‘आठवणीतले बाबासाहेब’ हे पुस्तक लिहीत असताना अनेकांच्या मुलाखती घेतल्या अन् भालचंद्र वराळे यांच्याशी संबंध आला. मराठवाड्यात नवाबाचा काळ असताना आंबेडकर चळवळ कायम टिकवली. जिद्द, चिकाटी आणि मेहनत आपल्याला यशापासून दूर ठेवू शकत नाही असे त्यांनी सांगितले. ज. वि. पवार म्हणाले की, आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे २३ खंड प्रकाशित आहेत. २४ वा खंड लवकरच प्रकाशित होईल. आम्ही पुस्तकांचे मराठी भाषांतर करून समाजासमोर बाबासाहेबांचे लिखाण आणत आहोत. प्रास्ताविक अॅड. इंदुमती वराळे यांनी केले. कार्यक्रमात लहुकांत वराळे, प्रा. वर्षा भोगले, मंगल खिंवसरा आदींची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.