आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यास दौरा:शेतकरी महिलांचे अभ्यास दौरे काळाची गरज : सत्तार

औरंगाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड तालुक्यातील कायगाव येथील १५१ शेतकरी महिला शनिवारी अभ्यास दौऱ्यावर रवाना झाल्या. कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून दौऱ्याला प्रारंभ झाला. त्या तीन ते चार दिवस राळेगणसिद्धी, हिवरेबाजार, राहुरी कृषी विद्यापीठ, बारामती, दापोली आदी ठिकाणी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक पाहणार आहेत.

नव्या युगात शेतकरी महिलांचे अभ्यास दौरे ही काळाची गरज असल्याचे सत्तार यांनी सांगितले. या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी प्रबोध चव्हाण, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, कायगावच्या सरपंच नंदाबाई जैवळ उपस्थित होते. सत्तार म्हणाले की, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला शेतात काम करतात. त्यामुळे पुरुषांप्रमाणे शेतकरी महिलांनादेखील आधुनिक शेतीचे मार्गदर्शन मिळावे. .

बातम्या आणखी आहेत...