आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षांत समारंभ:शिशू शिक्षणाला महत्त्व देण्याची गरज ; नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. भटकर यांचे मत

औरंगाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणाचे महत्त्व भविष्यात इतके वाढेल की देशात १००० विद्यापीठे तयार हाेतील, असे मी म्हटले हाेते. ते आज खरे झाले आहे. त्यातील एक महत्त्वाचे विद्यापीठ म्हणून औरंगाबादकडे पाहिले जाते. या देशात अनेक भाषा बाेलल्या जातात. त्यामुळे संगणक तंत्रज्ञान मातृभाषेतून उपलब्ध हाेईल की नाही असे विचारले जात होते. मात्र आता देशात उच्च तंत्रज्ञान शिक्षणही मायबाेलीत देण्याची साेय उपलब्ध झाली आहे. पण उच्च शिक्षणापेक्षाही आपण शिशू शिक्षणाला महत्त्व दिले पाहिजे, असे मत सुपर कॉम्प्युटरचे जनक पद्मभूषण, पद्मश्री, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी शनिवारी दीक्षांत समारंभात व्यक्त केले.

ते म्हणाले, ‘भारत आज जगातील आघाडीचे राष्ट्र बनले आहे. अर्थव्यवस्थेतही आपण ५ व्या क्रमांकावर आहोत. आगामी चार ते पाच वर्षात भारत आर्थिक महासत्ता हाेइल. उच्च शिक्षण आणि शैक्षणिक कामगिरीबाबतही देश अग्रेसर आहे. अध्यापन, अध्यापन आणि संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी राष्ट्रीय परिसंस्था निर्माण करण्याच्या अंमलबजावणीत हे विद्यापीठ खूप पुढे आहे, असेही डॉ. भटकर म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र माेदी विश्वगुरू माहिती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी कसे उपयोगी आणता येईल याबाबत शरद पवार माझ्या कार्यालयात येऊन नेहमी विचारत हाेते. आम्ही राजीव गांधींच्या काळातच तसा संकल्प केला होता, आणि तो पूर्ण झाल्याचा आनंद आहे, असे सांगताना डॉ. भटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याबद्दल ‘विश्वगुरू’ म्हणून गौरवोद‌्गार काढले.

मिनिट-टू-मिनिट प्रोग्रॅमला पाऊण तास उशीर कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दीक्षांत सोहळा वेळेत सुरू होईल, ‘मिनिट टू मिनिट प्रोग्रॅम’चे तंतोतंत पालन होईल, असा दावा त्यांनी केला होता. पण, तो फोल ठरला. कारण ‘मिनिट टू मिनिट प्रोग्रॅम’ पाऊण तास उशिराने सुरू झाला. ज्येष्ठ नेते शरद पवार वेळेच्या अर्धा तास आधीच आले होते. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना येण्यास उशीर झाल्यामुळे दीक्षांत सोहळा वेळेत सुरू झाला नाही.

दीक्षांत मिरवणूक ११:०५ वाजता सुरू होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ११:४० मिनिटांनी सुरू झाला. राष्ट्रगीत आणि विद्यापीठ गीत ११:०९ ऐवजी ११:४२ आणि ११:४४ वाजता सुरू झाले. दीक्षांत सोहळा सुरू झाल्याचे ११:१४ मिनिटांनी घोषित करण्याऐवजी कोश्यारी यांनी ११:५७ वाजता घोषित केले. त्यानंतर कुलगुरू डॉ. येवले यांचे प्रास्ताविक खूपच लांबले. विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सांगताना त्यांनी सर्व बारीक-सारीक तपशील सांगितले. त्यामुळे त्यांचे भाषण नियोजित दहा मिनिटांत संपण्याऐवजी २० मिनिटांचे झाले. त्यांच्या लांबलेल्या भाषणामुळे ३५ मिनिटांनी उशिरा सुरू झालेल्या कार्यक्रमात आणखी १० मिनिटे उशिराची भर पडली. नंतर ११:३१ ऐवजी कोश्यारी यांनी १२:१५ वाजता पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यास मान्यता दिली. ११:३७ ऐवजी १२:१८ वाजता गडकरींना डीलिट दिली.

त्यांनी मात्र अत्यंत कमी शब्दांत पण मुद्देसूद भाषण केले. त्यानंतर पवारांना १२:३९ वाजता डीलिट दिली. त्यांनीही आटोपशीर भाषण केले. डाॅ. भटकर यांचेही भाषण आटाेपशीर झाले. मात्र, कोश्यारी यांचे भाषण लांबले. दुपारी १:३० वाजेपर्यंत ते बोलत होते. कार्यक्रम संपण्याची नियोजित वेळ १२:१६ वाजेची होती. शरद पवार पुण्याहून हेलिकाॅप्टरने आले होते. ते १०:३५ वाजता नाट्यगृहात पोहाेचले. त्यानंतर ११:१० वाजता नितीन गडकरी आले. ज्यांच्याशिवाय कार्यक्रम सुरू करणे शक्य नव्हते ते कोश्यारी ११:३५ वाजता आले.

बातम्या आणखी आहेत...