आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे धोरण:आयुर्मान संपलेली मराठवाड्यातील 93 हजार वाहने स्क्रॅप करण्याची गरज

औरंगाबादएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • नवीन गाइडलाइन्सनुसार 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त जुन्या वाहनांवर कारवाई

केंद्राने नवीन वाहन स्क्रॅप धोरण आणले असून आता १५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुने वाहन बाळगणे महागात पडणार आहे. नव्या धोरणानुसार मराठवाड्यात ९३ हजार २५ वाहनांचे आयुर्मान संपले असून राज्यात मात्र या वाहनांची संख्या १० लाख २९ हजार ९७९ इतकी आहे. विशेष म्हणजे, राज्य परिवहन विभागाने २००५-०६ मध्ये नोंदणी झालेल्या वाहनांची नोंद घेतली असून ही वाहने स्क्रॅप करण्यासाठी वाहन मालकांनी समोर येणे गरजेचे आहे.

वाहनांपासून होणाऱ्या प्रदूषणावर आळा घालणे, रस्ते अपघात कमी करणे, परिवहन उद्योग, व्यवसाय विकास, बेरोजगारांच्या हाताला काम यासह विविध उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकाराच्या वतीने अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात १५ वर्षांच्या पुढील जुनी वाहने नष्ट करण्यासाठी “व्हेइकल स्क्रॅप’ धोरण जाहीर केले आहे. जुने वाहन स्क्रॅप केल्यावर नव्या वाहनाचे नोंदणी शुल्क माफ करण्याचा सरकारचा विचार आहे. एवढेच नव्हे तर स्क्रॅप करताना जुन्या वाहनाच्या किमतीचे मूल्यांकन करून तेवढीच सूट नव्या वाहनाच्या किमतीवर देण्याचा विचार होत आहे. यासह विविध सवलती दिल्या जाणार आहेत. यासाठी जुन्या वाहनांचे स्क्रॅपेज प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. त्याचा महाराष्ट्र, मराठवाड्यातील किती वाहनधारकांना लाभ घेता येईल? राज्यात १५ वर्षे पूर्ण झालेली १०.२९ लाखांवर विविध वाहने आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकी, कार, जीप आदी २१ प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

नियमावली अाली की अंमलबजावणी

आहे. यासह विविध सवलती दिल्या जाणार आहेत. यासाठी जुन्या वाहनांचे स्क्रॅपेज प्रमाणपत्र घेणे अनिवार्य केले आहे. त्याचा महाराष्ट्र, मराठवाड्यातील किती वाहनधारकांना लाभ घेता येईल? राज्यात १५ वर्षे पूर्ण झालेली १०.२९ लाखांवर विविध वाहने आहेत. त्यात सर्वाधिक दुचाकी, कार, जीप आदी २१ प्रकारच्या वाहनांचा समावेश आहे.

राज्यात १०.२९ लाखांवर वाहने झाली जुनी

वाहन अनफिट असेल तर ते रस्ते अपघातासाठी कारणीभूत ठरते. अशा वाहनांमुळे प्रदूषण वाढते. केंद्र सरकारने मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ५९ नुसार वाहन अायु मर्यादाचा निर्णय घेतला आहे. त्याची नियमावली अद्याप झाली नाही. लवकरच होईल, त्या गाइडलाइन्सनुसार, स्क्रॅप वाहनांवर कारवाई केली जाईल. - संजय मैत्रेवार, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद.

भुर्दंड सहन करावा लागेल

१५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक जुने वाहन असल्यास मोठ्या कराचा भरणा करावा लागेल नोंदणी नूतनीकरणाचे शुल्क ५० ते १०० टक्क्यांनी अधिक भरावे लागू शकते कारच्या मोटार वाहन नोंदणीचे नूतनीकरण १५ हजार, तर वाहतूक कारच्या नूतनीकरणासाठी २० हजारांपर्यंत लागू शकतात.

१५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांचा आलेख

वाहनांचा प्रकार राज्य मराठवाडा

 • दुचाकी ६२१४३४ ६६६०७
 • स्कूटर ८३२०२ ३१७५
 • मोपेड ४७१८० २५०४
 • कार १२८६२७ ५०१२
 • जीप १५३५१ १७०१
 • टॅक्सी मीटर फिटेड ११३६५ २०८
 • ऑटोरिक्षा २९५९९ ४१२६
 • काँट्रॅक्टर कॅरेज/मिनी बस ३२५३ ४०
 • स्कूल बस ३२१ ११
 • खासगी सर्व्हिसेस वाहन ८५४ ६७
 • अॅम्ब्युलन्स ४२६ २१
 • ट्रक लॉरी १५७७७ ९५०
 • डिलिव्हरी फोर व्हीलर व्हॅन १७९१९ ८०६
 • डिलिव्हरी थ्री व्हीलर व्हॅन २२०७७ २८१९
 • टँकर १३४३ ३८
 • ट्रॅक्टर्स १५५४५ ३०९९
 • ट्रेलर्स ८३४० १२३५
 • इतर २१७४ ९३
बातम्या आणखी आहेत...