आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिपत्रक:नर्सिंग प्रवेशासाठी नीटच्या गुणांची अट; आज सुनावणी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नर्सिंगसाठी प्रथमच नीटच्या गुणांची अट लागू करणाऱ्या भारतीय परिचर्या परिषदेने काढलेल्या दोन परिपत्रकांना औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. यासंदर्भातील याचिकेवर ३ नोव्हेंबरला सुनावणी होईल. याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांनी ॲड. प्रल्हाद बचाटे व ॲड. अमरजितसिंग गिरासे यांच्यामार्फत व प्रायव्हेट नर्सिंग स्कूल्स अँड काॅलेज मॅनेजमेंट असोसिएशन, असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट अनएडेड नर्सिंग काॅलेजकडून डाॅ. बाळासाहेब पवार व डाॅ. धनंजय कुलकर्णी यांनी मिळून वरिष्ठ विधिज्ञ विनायक होन व ॲड. अश्विन होन यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या आहेत.

याचिकेनुसार परिषदेने ४ ऑगस्ट व १७ ऑक्टोबर रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार नर्सिंग अभ्यासक्रम महाविद्यालयांना प्रवेशाचे नियम लागू केले आहेत. त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण प्रवेश पात्रता परीक्षेत ११३ ते ११७ गुणांची अट लागू केली. त्याचा आधार घेत सीईटी सेलनेही प्रवेश प्रक्रियेची यंत्रणा राबवली. परिणामी यंदाच्या सुरुवातीच्या फेरीत प्रवेश झाले नाही. मागच्या वर्षांपर्यंत नीट उत्तीर्ण होण्याची अट असली तरी गुणांची गरज नव्हती.

बातम्या आणखी आहेत...