आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय पूर्वपरीक्षा:‘नीट’ची प्रोव्हिजनल आन्सर की आज, आक्षेप शुल्क 800 कमी ; निकाल 7 सप्टेंबरला

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेची (नीट) प्रोव्हिजनल आन्सर की किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्स ३० ऑगस्ट रोजी, तर या परीक्षेचा अंतिम निकाल ७ सप्टेंबर रोजी neet.nta.nic.in वर जाहीर होईल. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने नुकतीच ही घोषणा केली आहे. आन्सर की किंवा रेकॉर्डेड रिस्पॉन्सवर विद्यार्थ्यांना आक्षेप असेल तर प्रत्येक प्रश्नामागे २०० रुपये भरून ते नोंदवता येईल. गेल्या वर्षी (२०२१) हे शुल्क प्रतिप्रश्न तब्बल १ हजार रुपये होते, त्यात आता मोठी कपात करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. ‘एटीएन’ने परीक्षेच्या पूर्वीच माहिती पुस्तिकेत शुल्क कपातीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे यंदा आन्सर कीवर आक्षेपांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.एका आरटीआय याचिकेनुसार, २०२० मध्ये रेकॉर्डेड रेस्पॉन्सवर देशभरातील ९८७० आक्षेप आले होते. यातून ‘एनटीए’ला १९ लाख ७४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. दरवर्षी इतकेच आक्षेप दाखल होतात.

एखाद्या विद्यार्थ्याचा आक्षेप योग्य असेल तरीही शुल्क त्याला परत मिळत नाही. प्रोव्हिजनल आन्सर कीवर आक्षेप दाखल झाल्यानंतर ‘एनटीएस’ एक्स्पर्टकडून त्याचा अभ्यास करून घेतात. त्यानंतर फायनल आन्सर की व निकाल जाहीर केला जातो. दरम्यान, परीक्षार्थीच्या नोंदणीकृत ई-मेल आयडीवर ओएमआर आन्सर की पाठवली जाते.

देशात ३५७० केंद्रांवर, विदेशातही १७ परीक्षा केंद्रे
या वर्षी देशभरातील १८ लाख ९३ हजार विद्यार्थ्यांनी ‘नीट’ परीक्षा दिली. आतापर्यंतची नीटची ही सर्वाधिक परीक्षार्थी संख्या आहे. ४९७ शहरात ३५७० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. केवळ देशातच नव्हे, तर विदेशातही १७ केंद्रांवर या परीक्षेसाठी सोय करण्यात आली होती. नीटमधील स्कोअरवर मेडिकल कॉलेज व एम्समध्ये एमबीबीएस प्रवेश दिला जातो. बीएस्सी नर्सिंगसाठीही ‘नीट’ गुणांच्या आधारे प्रवेश दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...