आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगण्य रक्तस्राव, रुग्णालयात कमी काळ वास्तव्य, शस्त्रक्रियेत अचूकता आणि रुग्णाला किंचितही त्रास न करणाऱ्या रोबोटिक असिस्टेड शस्त्रक्रियेला शहरातील कमलनयन बजाज रुग्णालयात सुरुवात झाली. यात विशेष म्हणजे आतापर्यंत २० रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. अन्ननलिका, गर्भपिशवी, किडनी, प्रोस्टेट ग्रंथी आणि आतड्यांच्या शस्त्रक्रियांत अविश्वसनीय परिणाम दिसून आला आहे, अशी माहिती रुग्णालयाचे विश्वस्त सी. पी. त्रिपाठी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी रुग्णालयाचे कर्करोग शल्यचिकित्सक डॉ. राजेश सावजी, मूत्रविकार शल्यचिकित्सक डॉ. आदित्य येळीकर, डॉ. ए. एम. ढमढेरे, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद वैष्णव, डॉ. प्रेरणा देवधर आणि डॉ. राजेश तौर उपस्थित होते.
त्रिपाठी म्हणाले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णालयाला नफा कमावणे हा आमचा उद्देश कधीच नाही. त्यामुळे आपल्या भागातील रुग्णांना गुणवत्तापूर्ण आयुष्य देणे हे आमचे धेय्य आहे. डॉ. ढमढेरे म्हणाले, रोबोटिक शस्त्रक्रियांमुळे विविध फायदे आहेत, पण गुणवत्तापूर्ण आयुष्य हा सर्वात मोठा फायदा आहे. या रुग्णालयात सातत्याने नवे तंत्रज्ञान वापरावर भर दिला जातो. शस्त्रक्रियेला अधिक खर्च आहे. मात्र, त्याचे इतर फायदे पाहता तो नगण्य आहे. डॉ. सावजी म्हणाले, आजवर राेबोटच्या माध्यमातून २० शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.
परदेशात ९० टक्के शस्त्रक्रिया रोबोटच्या साहाय्याने डॉ. आदित्य म्हणाले, आमच्याकडील रोबोट चौथ्या पिढीतील रोबोट आहे. अतिसूक्ष्म बाबीही यात तत्काळ दिसून येतात. ३६० डिग्रीत पाहता येत असल्याने अचूकता अधिकाधिक आहे. ९९.९९ टक्के प्रकरणात अपघात होत नाही. त्यासाठी रुग्णालयात आम्ही तीन डॉक्टरांनी पाच पातळ्यांवर प्रशिक्षण पूर्ण केले आहे. या वेळी रुग्णालयाच्या डॉ. नताशा वर्माही उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.