आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती. २४ डिसेंंबर १९६७ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू अजिंठ्यात येऊन गेले होते. त्यानिमित्त गावातील काही ज्येष्ठ मंडळींनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
औरंगाबादहून येणारी वाहने अजिंठा गावातून पुढे जळगावकडे जात असत. ठरल्या वेळेप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांचा ताफा सकाळी १० वाजता गावात आला. त्यावेळी त्यांचे मित्र देवकीनंद सारस्वत यांनी पंडित नेहरूंना हे अजिंठ्याचे प्रवेशद्वार असल्याचे सांगितले. त्यांनी स्मितहास्य करत चालकाला गाडी थांबवण्याचे सांगितले. त्यांनी निझामकालीन पूल, भिंत, दरवाजे याची पाहणी केली. गावातील पहिले सरपंच काशीनाथ साठे, त्यांचे चिरंजीव माधवराव साठे यांनी हार, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला. तेलीपुरा गल्लीत पंडित नेहरू उघड्या जीपने जात असताना ग्रामस्थांनी वंदे मातरम, चाचा नेहरू जिंदाबाद, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या होत्या. यामुळे चाचा नेहरू उल्हासित झाले हाेते, अशी माहिती इतिहासप्रेमी विजय पगारे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
अन् ताे ताफ्यात घुसला..
गांधी चाैकातून पंडित नेहरू सराय मार्गे जात असताना सराय येथे पहिली ते चौथीचे वर्ग सुरू होते. पंडित नेहरू या मार्गाने जाणार म्हणून पोलिसांनी त्या शाळेजवळ बांबू लावून मार्ग बंद केला होता. पंडित नेहरूंना पाहून मुले चाचा नेहरू जिंदाबादच्या घोषणा देत हाेती. लहान मुले प्रिय असल्याने नेहरूंनी गाडी थांबवून खाली उतरत मुलांना अभिवादन केले. तेवढ्यात त्यांच्या ताफ्यात एक मुलगा हातात तिरंगा झेंडा व पुष्पगुच्छ घेऊन चाचा नेहरू जिंदाबाद म्हणून ताफ्यात घुसून नेहरूंजवळ गेला. त्या मुलाचे धाडस पाहत नेहरूंनी त्याला कडेवर घेत स्वागत स्वीकारले होते. त्या मुलाचे नाव मधुसूदन कुलवाल आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.