आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॅडमिंटन:नेहरू महाविद्यालय महिला संघ विजेता; विवेकानंद महाविद्यालय पराभूत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित आंतरशालेय बॅडमिंटन स्पर्धेत पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावले. संघाने १९ वर्षांखालील गटात ही पदकीय कामगिरी केली. विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम सामन्यात पंडित नेहरू महाविद्यालयाच्या संघाने विवेकानंद महाविद्यालयाच्या संघावर २१-११, २१-०२ गुणांनी मात करत जेतेपद राखले. संघाच्या विजयात राष्ट्रीय खेळाडू सोनाली मिरखेलकर, समीक्षा नलावडे, सृष्टी जाधव, माधुरी नलावडे व काजल जाधव यांनी मोलाचे योगदान दिले. या कामगिरीमुळे संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला. त्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष रंगनाथ काळे, सचिव प्रकाश काळे, प्राचार्य डॉ. पंडित नलावडे, उपप्राचार्य डॉ. एस. आर. मंझा, प्रशिक्षक हिमांशू गोडबोले, डॉ. संभाजी वाघमारे आदींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...