आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद:ऑनलाइनवर शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचा ‘नेबर कट्टा’; शिक्षणासाठी स्मार्ट फोन असलाच पाहिजे असा हट्ट नाही

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वीलेखक: विद्या गावंडे
  • कॉपी लिंक
  • सागरगोटे आणि चिंचुक्याने केली जाते वजा-बाकी अन् बेरीज

तंत्रज्ञानाच्या युगात सागरगोटे, चिंचुक्यांचा खेळ जणू हरवलाच आहे. त्याची जागा आता स्मार्ट फोन आणि कंम्प्युटरने घेतली. काळानुरुप ते गरजेचे आहे. मुलांच्या शिक्षणासाठी शहरात याचा प्रामुख्याने वापर होते. पण कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा परीक्षा न घेताच शाळांना सुट्या देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून या गोंडस नावाखाली ऑनलाइन  शिक्षणाचा घाटही घालण्यात आला. परंतु ऑनलाइन शिक्षण हे सर्वांनाच शक्य आहे असे नाही. तशा सुविधा सर्वांकडेच उपलब्ध असतीलच असे नाही. यावर उपाय शोधण्यापेक्षाही त्यावर तर्क वितर्क केले जात आहे. जुलै उजाडला तरी शाळा सुरु नाहीत पण यावर आता पर्याय शोधला आहे. सोयगाव तालुक्यातील दत्तावाडी येथील जिल्हा परिषद शाळेने त्यांनी ऑनलाइला पर्याय म्हणून गावातील विद्यार्थ्यांसाठी खास "नेबर कट्टा' केला असून, त्यामुळे मुलांना हसत-खेळत शिकता येत असून, त्यांच्या कल्पकतेला वाव मिळतो आहे. या नेबर कट्ट्याने सर्वां समोर एक आदर्श ठेवला आहे.

 औरंगाबाद शहरापासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्या स सोयगाव तालुक्यातील दत्तवाडी तालुका आहे. डोंगराळ भागतल हे गाव अवघ्या १६५ लोकवस्ती असलेल आहे. या गावात सर्व गोर गरीब मजुरी अन् शेती करणारे लोके आहेत. सध्या  कोरोनामुळे शाळा बंद असल्यामुळे ऑनालईनच्या माध्यमातून शिक्षण सुरु आहे. मात्र, ग्रामीण भागात मोबाईल, इंटरनेट यासारख्या सुविधा नसल्यामुळे ही मुले शिक्षणापासून वंचित रहात होते. शाळेत असतांना जे शिकले ते विद्यार्थी विसरु नयेत. त्यांच शिक्षण सुटे नये. विशेषत. मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढ शकते. या भितीमुळे आता काय उपाय करता येईल. शहरातील शाळांप्रमाणे अथवा पालकांच्या सुविधा गावात कुठून येणार इथे तर दोन दोन दिवस वीजही रहात नाही. पण स्मार्ट फोन नसला तरी साधा फोनही उपयोगी येवू शकतो. ही बाब हेरुन  शिक्षकांनी सोशल अन् फिजिकल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करण्याकरिता सुरुवातीला पालक आणि विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले. कोरोना कसा होतो, तो होवू नये.यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती दिली अन्  साध्या टेक्स मॅसेच्या माध्यमातून मुलांना अभ्यास देण्यास सुरुवात झाली. मग प्रश्न होता हा अभ्यास मुलांपर्यंत पोहचवायचा कसा तर सुरुवात झाली " नेबर कट्टा '  या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण नियमित सुरू आहे. नेबर कट्टा या उपक्रमाअंतर्गत शिक्षणाबरोबर गप्पा, गोष्टी, सागरगोट्यांचा खेळ, स्पेलिंग, पाढे, प्राण्यांचे आवाज, नक्कल या सारख्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आता तुम्ही म्हणाला की स्मार्ट फोन नाही मग गोष्टी, प्राण्यांचे आवाज कसे तर यावर उत्तर असे की, पहिली ते पाचवीपर्यंत असलेल्या या शाळेत सध्या १९ विद्यार्थी आहेत. त्यांचे तीन जणांचे गट करण्यात आले असून, टेक्स्ट मॅसेजवर आज काय करायचे आहे हे ज्यांच्या पालकांकडे फोन त्यांना सांगण्यात येते. मग त्या घरातील विद्यार्थी शेजाऱ्याच्या वर्ग मित्रास आपल्या अंगणातून अथवा गच्चीवरुन माहिती देतो. मग हे मुल ठरवून दिलेल्या जागेवरच बसून तो अभ्यास करतात. एकमेकांचे साहित्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुणी वापर नाही. यामुळे सोशल डिस्टन्सचे पालनही होते.

असा आहे नेबर कट्टा 

यामध्ये एकाच ठिकाणी किंवा शेजारी शेजारी राहणाऱ्या तीन-तीन विद्यार्थ्यांचा गट तयार करण्यात आला आहे. प्रत्येक गटात वेगवेळ्या वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. विद्यार्थ्यांच्या या गटांना मोबाईलवर आभ्यासाबाबतचा टेक्स मेसेज केला जातो. या मॅसेजनुसार विद्यार्थ्यांच्या गटागटाने घरच्या वसाऱ्यात, बाल्कनीत, किंवा घराच्या गच्चीवर दहा फुटाचे अंतर ठेवून आपला नियमित अभ्यास करतात.

ग्रामीण भागातील अडचणींमुळे मुलांचे शाळा सोडण्याचे प्रमाण वाढते. आता तर लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. लॉकडाऊन अनलॉक झाले तरी शाळा अजून सुरु झालेल्या नाहीत. मुलांचे नुकसान होवू नये म्हणून ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. पण ग्रामीण भागातील अडचणी वेगळ्या आहेत. शाळा नियमित सुरु नसेल तर मुलींची शाळा प्रथम बंद होते. जे मुलं शाळेत शिकले ते विसरु नये. मुलांचे शिक्षण सुरु रहावे या उद्देशाने आम्ही हा नेबर कट्टा सुरु केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तुमच्याकडे सुविधा नसल्या तरी शिक्षण थांबू शकत नाही हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहोत. माझ्यासोबत माझे सहकारी शिक्षक गणेश बाविस्कर आहेत.- बापू बावीस्कर मुख्याध्यापक जि.प. शाळा दत्तवाडी