आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरक्षेच्या कारणावरून लष्करी हद्दीलगत जाहीर नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे हद्दीच्या पन्नास मीटर परिघात भविष्यात बांधकामे करता येणार नाहीत. लष्कराच्या २३ डिसेंबर २०२२ रोजीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शहरातील लष्कराच्या आस्थापनांच्या हद्दीपासून पन्नास मीटर अंतरावर कुठलेच बांधकाम करता येणार नाही. चार मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारत बांधायची झाल्यास छावणीच्या सीमेपासून पाचशे मीटर अंतरावर बांधावी लागणार आहे. पन्नास मीटर हद्दीमधील बांधकामामुळे सुरक्षेला धोका निर्माण होत असेल तर त्यासंबंधीचा अहवाल छावणीचे कमांडर उच्चपदस्थ संस्थेकडे पाठवून त्याचे अधिग्रहण करू शकतात, असे अधिकार प्रदान केले आहेत.
मनपा हद्दीसह सिडकोतील मालमत्तांना याचा फटका बसणार आहे. भविष्यातील विकास यामुळे खुंटणार आहे.यापूर्वी केवळ १० मीटरची मर्यादा होती. नव्याने लष्कराच्या भूमी विभागाच्या संचालक शर्मिष्ठा मैत्रा यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये लष्कराच्या मालकीच्या जागा, दारूगोळ्याचा डेपो, फायरिंग रेंज याशिवाय इतर महत्वाची कार्यालये असतील तेथून पन्नास मीटरवर कुठल्याही प्रकारची बांधकामे करता येणार नाहीत.
यांना बसणार फटका छावणीलगत गोलवाडी, तिसगाव, पडेगाव, भावसिंगपुरा, कर्णपुरा, बनेवाडी, सिडको वाळूज महानगर आदी भागांवर लष्कराच्या नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा फटका बसणार आहे. छावणीच्या मालकीच्या मालमत्तेची व्याप्ती मोठी आहे. नगर पुणे रोड, दौलताबाद रोड, वाळूज वसाहती आदी भागात छावणीच्या आस्थापनांचा विस्तार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.