आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात नवीन शैक्षणिक धोरणाने नवचैतन्य आणले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक व संख्यात्मक बदल होईल, असा विश्वास पत्रकारिता विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांनी व्यक्त केला.
विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्रात शिक्षणशास्त्र विषयातील प्राध्यापकांच्या उजळणी वर्गाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कोर्स समन्वयक डॉ. प्रशांत पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. धारूरकर म्हणाले, विद्यापीठे व महाविद्यालयांची आयक्वॅक सेलप्रमाणे “नवीन शैक्षणिक धोरण’ कक्ष स्थापन करून प्रभावी अंमलबजावणी करावी.’ डॉ. पगारे यांनी प्रास्ताविक केले. कोर्समध्ये देशातील ४० प्राध्यापक सहभागी झाले. केंद्राच्या संचालक डॉ. धनश्री महाजन व सहसंचालक डॉ. मोहंमद अब्दुल राफे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.