आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:नवीन ज्ञान डॉक्टरांपर्यंत पोहोचणे गरजेचे; कार्यशाळेत तज्ज्ञांचे मत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवनवीन उपचार पद्धती, तंत्रज्ञान, संशोधनाची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांवर अधिक प्रभावी आणि योग्य प्रकारे उपचार होतील, असे मत इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन (आयएससीसीएम) औरंगाबाद शाखेतर्फे कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्रणेवर आयोजित कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी तज्ज्ञांनी मांडले.

कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी दुबई येथून आलेले डॉ. प्रशांत नासा यांनी व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला देण्यात येणाऱ्या औषधींविषयी मार्गदर्शन केले. डॉ. नासा औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. हृदय आणि फुप्फुसाच्या व्हेंटिलेशनमधील संबंध, कृत्रिम, नैसर्गिक श्वासोच्छ्वास यांची सांगड कशी घालायची, ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर ते कसे वाढवायचे, दम्याच्या रुग्णाला व्हेंटिलेटर कसे द्यायचे यावर कपिल झिरपे, सुभाल दीक्षित, संजय धानुका, कपिल बोरावके आदींनी मार्गदर्शन केले. प्रात्यक्षिकांच्या सत्रात डॉ. श्रीकांत सहस्रबुद्धे यांनी सोनोग्राफी यंत्राचा वापर करून हृदय, फुप्फुसांचे संचालनावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेसाठी डॉ. शरद बिरादर, डॉ. योगेश लक्कस, डॉ. धनंजय खटावकर यांनी सहकार्य केले. ----------------------

बातम्या आणखी आहेत...