आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'स्मार्ट वाहतूक' करण्यासाठी स्टार्ट अ‍ॅप्सला आवाहन:सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी 'स्टार्ट अ‍ॅप्स' कडून नवीन तंत्रज्ञानयुक्त उपाय अपेक्षित

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी सुधारता येऊ शकते, यासाठी नवीन उद्योजक म्हणजेच स्टार्ट अ‍ॅप्सकडून उपाय मागविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या नगर विकास विभागाकडून उत्कृष्ट उपाय योजना प्रदान करणाऱ्या स्टार्ट अ‍ॅप्सला 20 लाख पर्यंत बक्षीस मिळणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत यात सहभागी होत येईल.

ट्रान्सपोर्ट फॉर ऑल या स्पर्धेत देशातले 45 शहरांची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेअंतर्गत शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सोयीस्कर, परवडणारी आणि कार्यक्षम कशी करता येईल याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी विविध तंत्रज्ञान युक्त उपाय करून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्ती जास्त नागरिकांना फायदा होईल हे उद्दिष्ट आहे.

स्पर्धेत औरंगाबाद सहभाग

मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ अभिजित चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद सुद्धा स्पर्धेत भाग घेत आहे. त्या मुळे औरंगाबाद शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला कसं सुधारता यावा, यासाठी स्टार्ट अ‍ॅप्सला औरंगाबाद स्मार्ट सिटी कडून आवाहन करण्यात येत आहे.

येथे माहिती देण्याचे आवाहन

जर एकाध्या स्टार्टअ‍ॅप कडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाी उपययोजना असेल तर त्यांनी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत smartnet.niua.org/transport4all वर जाऊन स्पर्धेसाठी नोंदणी करावी. या संकेस्थळावर जाऊनच स्पर्धेबाबत पूर्ण माहिती प्राप्त करता येते.

असे सुचवा उपाय

शहर बस सेवा व अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्त लोकांनी लाभ घ्यावा यासाठी डिमांड आणि गरजा लक्षात घेऊन मार्गाचे नियोजन करणे, सिटी बस सेवा व त्यातील काम करणारे कर्मचाऱ्यांचे वेळापत्रक ठरवण्यासाठी उपाय, बस सेवेचा नियंत्रण आणि निरीक्षण करण्यासाठी उपाय, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी व नियोजन करण्यासाठी मोबाईल ॲप, प्रवाशांची तक्रार नोंदवण्यासाठी सिस्टीम व ऑटो रिक्षा व कॅब यांची नियंत्रण आणि निरिक्षण करणारी यंत्रणा आदींबाबत आपण उपाय सुचवावा, असेही आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...