आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोग दिन विशेष:कर्करोगावर मात करण्यासाठी नव्या थेरपी ; चर्चासत्रात सहभागी तज्ज्ञांनी केला ऊहापोह

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्करोग म्हणजे मृत्यू हे समीकरण आता बदलले आहे. ७० टक्के प्रकरणात कर्करोगावर मात करून गुणवत्तापूर्ण आयुष्य देणे शक्य झाले आहे. बहुतांश किमोथेरपीमध्येही आता केस जाणे, विद्रूप दिसणे संपले आहे. अलीकडील वर्षभरात कर्करोगावरील ५० पेक्षा अधिक नवसंशोधित औषधांना एफडीएने मान्यता दिली आहे. त्यांचे परिणाम उत्तम आहेत, अशी माहिती कर्करोगतज्ज्ञांनी दिली.जेनेटिक म्युटेशन, तंबाखू, केमिकल इन्फेक्शन अशा विविध कारणांनी कर्करोग होतो. मागील काळात झालेल्या विविध संशोधनांनी हा आजार बरा तर होतोच, पण रुग्णाला गुणवत्तापूर्ण आयुष्यही मिळाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

स्थूलतेशी संबंधित १२ ते १३ कर्करोग कर्करोग होण्याची अनेक कारणे आहेत. पण, एकट्या स्थूलतेशी संबंधित १२ ते १३ कर्करोग आहेत. हे संशोधनांनी सिद्ध झाले आहे. पुरुषांमध्ये प्रोस्टेड, तर महिलांमध्ये सव्हार्यकल कर्करोग सर्वाधिक प्रमाणात अाढळत आहेत. लवकर निदान, तत्काळ व योग्य उपचार महत्वाचे आहेत. ७० टक्के रुग्ण चौथ्या टप्प्यात उपचारांसाठी येतात. ५० टक्के कर्करोगांची कारणे माहिती आहेत, तर ५० टक्केंची कारणे आजही अनाकलनीय आहेत. डॉ. अमोल उबाळे, वरिष्ठ कन्सल्टंट रेडिएशन आँकोलॉजी

महिलांबाबत संवेदनशीलता गरजेची इतर कर्करोगाच्या रुग्णांच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब उभे राहते. पण, जेव्हा एखाद्या महिलेला कर्करोग होतो तेव्हा आजारामुळे ती पूर्णपणे ढासळतेच, परंतु दुसरा हल्ला तिच्यापासून वैवाहिक आयुष्यावर होतो. भावनिक खच्चीकरण होते. त्यामुळे पतीचा आधार महिलांना या काळात गरजेचा असतो. पहिल्या समुपदेशनाला पती येतात, नंतर गायब हाेतात. इतर नातेवाईक तिच्यासोबत येतात. हा धक्का आजाराशी लढण्याचे बळ काढून घेतो. त्यामुळे तिला भावनिक आधार गरजेचा आहे. डॉ. आस्फिया खान, कन्सल्टंट रेडिएशन आँकोलॉजी.

कर्करोग टाळण्याबद्दल जागरूकता हवी कर्करोगाला थांबवण्यासाठी विविध प्रकारे उपचारांत आणि प्रतिबंधात्मक उपायांत संशोधने सुरू आहेत. तंबाखू, सिगारेटसारखी व्यसने कर्करोगाला ट्रिगर करतात. कर्करोगाच्या पेशींना अॅक्टिव्ह करतात. त्यामुळे दररोज ३० मिनिटांचा व्यायाम, सकारात्मक वृत्ती या आजारांना डोके वर काढू देत नाहीत. आहारविहाराच्या चांगल्या सवयीही याचा प्रतिबंध करतात. याशिवाय लवकर निदान आणि ताबडतोब उपचारही महत्त्वाचे ठरतात. डॉ. प्रफुल्ल जटाळे, कन्सल्टंट न्यूक्लिअर मेडिसिन केअर, सिग्मा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स

बातम्या आणखी आहेत...