आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांचा खंड:नव्या वर्षाची सुरुवात ‘आविष्कार’ने ; तंत्रज्ञान, विज्ञानविषयक दृष्टिकोन होणार विकसित

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नवे वर्ष संशोधनानेच सुरू होणार आहे. ३ अणि ४ जानेवारीदरम्यान ‘आविष्कार’ महोत्सव होत आहे. ‘कोविड’मुळे तीन वर्षे हा महोत्सव झाला नव्हता. विद्यार्थ्यांचा तंत्रज्ञान व विज्ञानविषयक दृष्टिकोन विकसित होण्यास हा महोत्सव कारणीभूत ठरणार आहे.

शैक्षणिक सत्र २०१९ दरम्यान आविष्कार महोत्सव झाला होता. त्यानंतर २०२०, २०२१ आणि २०२२ दरम्यान आविष्कार महोत्सव होऊ शकला नव्हता. आता ३, ४ जानेवारी २०२३ रोजी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पदवी, पदव्युत्तर पदवी, एमफिल-पीएचडी आणि प्राध्यापकांनी केलेले संशोधनाचे प्रदर्शन या महोत्सवात आयोजित केले जाईल. मानव्यविद्या, वाणिज्यशास्त्र, विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय-औषधनिर्माणशास्त्र या सहा ज्ञानशाखांचे विद्यार्थी यात सहभागी होतील. प्रत्येक शाखेत महाविद्यालयांना दोन असे एकूण सहा संघ पाठवता येतील.

ऑनलाइन नोंदणीसाठी http://bamu.ac.in/Avishkar.aspx हे स्वतंत्र ‘वेबपोर्टल’ सुरू केले आहे. संलग्नित महाविद्यालये व पदव्युत्तर विभागांनी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन नोंदणी करावी. २७ डिसेंबरपर्यंत हार्डकॉपी जमा करता येईल. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी नुकतीच ‘आविष्कार’च्या सल्लागार समितीची बैठक घेतली. बैठकीला कुलसचिव डॉ. भगवान साखळे, ‘आविष्कार’चे समन्वयक डॉ. रत्नदीप देशमुख, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. संजय सांभाळकर यांच्यासह सल्लागार समिती सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.

समितीत दहा जणांचा समावेश अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सुनील नरवडे, पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. सतीश पाटील, डॉ. भारती गोरे, डॉ. वीणा हुंबे, डॉ. स्मिता साबळे, डॉ. सचिन भुसारी, डॉ. सुनील कावळे, डॉ. शशांक सोनवणे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख यांचा या समितीत समावेश आहे. डॉ. रत्नदीप देशमुख समन्वयक आहेत.

संशोधनाला चालना मिळेल पहिल्या दिवशी सादरीकरण होईल. बेस्टचे अंतिम दिवशी प्रेझेंटेशन होईल. प्रत्येक ज्ञानशाखेतून दोघांना बक्षिसे दिली जातील. यामुळे संशोधनाला चालना मिळेल. -डॉ. रत्नदीप देशमुख, समन्वयक

बातम्या आणखी आहेत...