आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोयत्याने हल्ला:शहरात भररस्त्यात अज्ञातांकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, नूतन कॉलनीत घडली घटना

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

दोन ते तीन जणांनी एका तरुणाला कोयत्याने मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या क्रांती चौक ते पैठण गेट रोडवरील नूतन कॉलनी येथे ही घटना घडली. वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सात वाजेच्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात युवकांनी एका युवकावर धारदार शस्त्राने वार केला. हा प्रकार पाहून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. दरम्यान नूतन कॉलनी येथून हे युवक जिल्हापरिषदजवळ आले. तिथेही त्यांच्यात वाद सुरू झाल्याने परिसरात दहशद निर्माण झाली होती. परंतु, यापैकी एका जागरूक नागरिकांने या घटनेचा व्हिडिओ तयार केला व संबंधीत प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. यांच्यापैकी दोघे जण फरार झाले आहेत.

एका आरोपीस सिटीचौक पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यास क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जिल्हापरिषद गाठत युवकांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याजवळ असलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी सिटीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, भांडणाचे नेमके कारण काय? याबाबत पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...