आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान:तीन दिवसांपासून रात्रीचे तापमान स्थिर, उद्यापासून थंडीचा कडाका वाढणार

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तरेतील शीत वारे संथ गतीने वाहून येत आहेत. दुसरीकडे सूर्य तळपू लागला आहे. आकाशात अंशत: ढग जमा होतात. परिणामी सोमवार ते बुधवार किमान तापमान १५ अंश सरासरी राहिले. ४ ते ६ नोव्हेंबरदरम्यान ते तीन अंशांनी कमी होते. तर ११ नोव्हेंबरला तापमान पुन्हा १२ अंश सेल्सियसवर नीचांक पातळीवर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे उद्यापासून थंडीचे प्रमाण वाढण्याची चिन्हे आहेत.

यंदा २२ ऑक्टोबरपर्यंत पाऊस बरसला. त्यानंतर चार दिवस तापमान वाढले व लगेच हवेचा दाब वाढून उत्तरेतील शीत वारे आपल्याकडे दाखल झाले. म्हणजेच हिवाळा ऋतूला सुरुवात झाली. १ नोव्हेंबरला यंदाच्या मोसमांत सर्वात कमी १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. मात्र, शीत, उष्ण आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा संगम होऊन तापमानात चढउतार होत आहेत. त्यानुसार २ व ३ नोव्हेंबरला १४.५ ते १४ अंश आणि ४ ते ६ नोव्हेंबर १३.३ ते १३ अंश आणि ७ ते ९ नोव्हेंबर दरम्यान १५.२ अंशदरम्यान किमान तापमान राहिले, तर कमाल तापमान ३१.२ म्हणजे सरासरीच्या तुलनेत १ अंशांनी किंचित वाढ झाली. उत्तरी शीत वाऱ्यांचा वेग वाढून ११ व १२ नोव्हेंबरला रात्रीचे तापमान पुन्हा १२ अंशांपर्यंत घसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हिंगोली, औसा, बारामतीसह काही शहरात ढगांची गर्दी हिंगोली, औसा, बारामती आदी शहरांवर ढगांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थळनिहाय तापमानात कमालीचा फरक राहणार आहे. म्हणजे कुठे थंडीचा कडाका राहील, तर कुठे तापमान जाणवेल. दुपारच्या सत्रात उन्हाचा चटका सर्वत्रच राहील असा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...