आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आच्छादन:रात्रीच्या तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंशांनी घसरण; 11 नाेव्हेंबरनंतर थंडी वाढेल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सरासरीच्या तुलनेत रात्रीच्या तापमानात तीन अंशांनी घसरण झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने शनिवारी घेतली. म्हणजेच १६ अंशऐवजी १३ अंशावर तापमान खाली आले आहे. सायंकाळ ते सकाळपर्यंत हुडहुडी भरत आहे. हवामानात वेगाने बदल होत असून ११ नोव्हेंबरनंतर पुन्हा तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. औसा, हिंगोली, परतूर, रिसोड, वाशिम, बारामती शहरावर ढगांचे आच्छादन राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

यंदाच्या हंगामात १ नोव्हेंबरला किमान तापमान प्रथमच सर्वात कमी १२.५ अंश सेल्सियसवर आले हाेते. आता उत्तरेकडून शीत वारे वाहत येत आहेत. त्यामुळे तापमानात बदल होतोय. परिणामी दुसऱ्या दिवशीच २ आणि ३ नोव्हेंबरला पुन्हा दोन अंशांनी तापमान वाढून १४.५ अंशांवर गेले होते. त्यात ४ नोव्हेंबरपासून दोन अंशांवर घसरण झाली. पुढील पाच दिवस रात्रीचे तापमानात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यानंतर पुन्हा दीड ते दोन अंशांपर्यंत तापमान घसरून ते १२ अंश सेल्सियसपर्यंत नीचांकी पातळीवर येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...