आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गढी नाही, माणसे हलतात; निलंगेकरांचा प्रतिहल्ला:माजी मंत्री देशमुखांच्या प्रतिक्रियेवर दिले उत्तर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही दिवसांपासून माजी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होती. गढी हलत नसल्याचा दाखला देत देशमुख यांनी ही चर्चा खोडून काढली होती. मात्र, गढी हलत नसली तरी त्यातील माणसं हलत असल्याचा इतिहास महाराष्ट्राने पाहिला असल्याचे सांगत भाजप नेते संभाजी पाटील निलंगेकर यांनी देशमुखांना प्रत्युत्तर दिले. अमित देशमुख केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करत असल्याची टीका त्यांनी या वेळी केली.

नियोजन विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अमित देशमुख यांच्या भाजप प्रवेशाबद्दल संभाजी पाटील निलंगेकर यांनी विरोध केला होता. त्यानंतर देशमुख यांनी वाडा गढी हलणार नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक गड पडत चालले आहेत.

वाड्यातले गढीतले लोक हलत असून ते प्रवेश करत असल्याचे निलंगेकर म्हणाले. कॉंग्रेसमधील आपली राजकीय सोय साधण्यासाठी देशमुख अशी वक्तव्ये करत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उंबरठ्याच्या अलीकडे यायचे की पलीकडे राहायचे हे ठरवण्याचा सल्ला त्यांनी दिला. गेल्या विधानसभा निवडणुकीत अमित देशमुखांनी धीरज देशमुखांसाठी शिवसेनेसोबत अ‍ॅडजेस्टमेंट केल्याची चर्चा सुरू होती. याबाबत विचारले असता लोक आता हुशार झाल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...