आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गेल्या नऊ महिन्यांपासून ज्या दिवसाची प्रतिक्षा विद्यार्थ्यांसह शिक्षकांना होती. तसेच पालकांच्या मनात आजही संभ्रम आणि चिंता आहेत. तो दिवस म्हणजे शाळा कधी उघडणार?अखेर तो दिवस ४ जानेवारी रोजी उजाडणार असून, शांत असलेली शहरातील शाळेची घंटा वाजणार आहे.
ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग यापूर्वीच सुरु करण्यात आले आहेत. मात्र शहरातील केवळ अकरावी बारावीचेच वर्ग सुरु करण्यात आले होते. ती परिस्थिती पाहून आता शहरातील नववी आणि दहावीचे वर्ग नव्या वर्षात म्हणजे ४ जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी बी.बी.चव्हाण यांनी पत्राद्वारे कळवले आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव यामुळे मार्च महिन्यात परीक्षा न घेताच शाळा बंद करण्यात आल्या होत्या. शिवाय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये. यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरु करण्यात आले. परंतु या ऑनलाइन शिक्षणात अनेक अडचणी आहेत. शहरी असो वा ग्रामीण विद्यार्थ्यांना ऑनलाइल शिकवलेले समजत नाही. शिक्षकांशीही संवाद होत नसल्याने मानिसक ताण-तणाव देखील निर्माण होत असल्याचे पालकांनी म्हटेल आहे. मागील महिन्यात परिस्थितीचा अंदाज घेवून २३ नोव्हेंबरपासून ग्रामीण भागातील ९ ते १२ वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर शहरातील परिस्थितीचा आढावा घेवून निर्णय घेण्यात येईल असे त्यावेळी मनपा आयुक्त अस्तिक कुमार पांडे म्हणाले होते. त्यानंतर शहरातील अकरावी बारावीचे वर्ग सुरु करण्यात आले असून, आता ४ जानेवारीपासून ९ आणि १० वीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात खासगी, अनुदानित, विनाअनुदानित, अंशत:अनुदानित, स्वयंअर्थसहाय्यीत, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांचा समावेश असल्याचेही पत्रात म्हटले आहे. तत्पूर्वी ३ जानेवारीपर्यंत सुट्या असल्याने शिक्षकांनी आरटीपीसीआर चाचणी करुन घेणे अनिवार्य असणार आहे. असेही चव्हाण म्हणाले.
असे आहेत नियम
वारंवार शाळा सॅनेटाइज केली जाईल, शाळेत मास्क, सॅनिटायझर वापरुन कोविडचे सर्व प्रोटोकॉल पाळावे लागणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.