आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निथॉन वनडे चषक:जाधव इलेव्हन संघाची युनिव्हर्सलवर मात, इरफान ठरला सामनावीर तर साहिलचे अर्धशतक

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री तालुक्यातील पाल येथील एचएसजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात साहिल तडवीच्या (96*) अर्धशतकाच्या जोरावर जाधव इलेव्हन संघाने विजय मिळवला. बुधवारी झालेल्या लढतीत जाधवने युनिव्हर्सल अकादमीवर 9 गडी राखून मात केली. या लढतीत इरफान सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना युनिव्हर्सलने 36.5 षटकांत सर्वबाद 160 धावा उभारल्या. संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर अभिषेक इंदापुरे 12, विश्वजीत मार्कांडे 14 धावांवर परतले. दुसरा सलामीवीर दर्शन थोरकर व सोहम नरवडे भोपळाही फोडू शकले नाहीत. मधली फळी देखील मोठी खेळी करण्यात अपयशी ठरली. हर्ष शेळके 18, पियुष अग्रवाल 9 आणि कर्णधार प्रथमेश साखरे अवघ्या 12 धावांवर बाद झाले. संघ संकटात असताना शिवम शिंदेने एकाही लढत देत अर्धशतक झळकावले. त्याने 67 चेंडूंत 12 सणसणीत चौकार खेचत सर्वाधिक 60 धावांची खेळी केली. त्यानंतर सलग दोन फलंदाज महेंद्र थिटे व अजय सोळुंके शुन्यावर परतले. संघाला जवळपास 35 धावा अतिरिक्त मिळाल्या. जाधवकडून वेगवान गोलंंदाज इरफानने भेदक मारा करत 26 धावा देत 4 फलंदाज तंबूत पाठवले. कृष्णा खराबेने 2, व्यंकटेश हुरकुडे, ऋषिकेश पांचाळ, श्रवण घोरपडे यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केला.

साहिल तडवीची अर्धशतकी खेळी

प्रत्युत्तरात आव्हानाचा पाठलाग करताना जाधव संघाने 17.1 षटकांत 161 धावा करत विजय साकारला. यात सलामीवीर कर्णधार साहिल तडवीने जोरदार फटकेबाजी करत नाबाद अर्धशतक झळकावले. त्याचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. त्याने 54 चेंडूंचा सामना करताना 17 सणसणीत चौकार व 2 उत्तुंग षटकार खेचत नाबाद 96 धावांची खेळी केली. दुसरा सलामीवीर व्यंकटेश हुरकुडेने 40 चेंडूंत 9 चौकारांच्या मदतीने 48 धावा काढल्या. कल्पेशने प्रथमेश साखरेच्या हाती त्याला झेलबाद करत अडथळा दूर केला. पृथ्वी पलने 7 धावांवर नाबाद राहिला. युनिव्हर्सलचा मयंक सर्वात महागडा गोलंदाज ठरला. कल्पेशने एकमेव बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...