आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महोत्सवाचे आयोजन:इस्कॉन व्हीईसीसीद्वारे आजपासून नित्यानंद त्रयोदशी महोत्सव

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्कॉन व्हीईसीसीद्वारे ३ फेब्रुवारी रोजी नित्यानंद त्रयोदशी महोत्सवाचे आयोजन इस्कॉन व्हीईसीसी प्रांगण, वरूड फाटा, जालना रोड येथे करण्यात आले आहे. यात ४ फेब्रुवारीपर्यंत रोज सकाळी ७.४५ वाजता हरिविलास महाराज भागवत कथेचे निरूपण करतील. महाप्रसादाचेही वितरण होईल.

शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता दीक्षा समारंभात ४ भाविकांना दीक्षा प्रदान केली जाईल. गौर-नीताईचा (कृष्ण-बलराम) पंचामृत अभिषेक होईल. छप्पन भोगचा प्रसाद अर्पण होईल. संध्याकाळी ७ वाजता गौर कथेचे निरूपण होईल. सर्व भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...