आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी विशेष:‘नियम’, ‘कुलूपबंद’ लघुपटांचे टोरंटोत कौतुक, घरात राहून कोरोनाविषयक सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटांची केली निर्मिती

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्रामीण भागातील कलाकाराने मांडला सामाजिक आशय

मराठी चित्रपटांनी अटकेपार झेंडे केव्हाच लावले होते. त्यावर कॅनडाच्या टोरंटोमध्ये झालेल्या कोरोना जनजागृतीविषयक कार्यक्रमात आशिष निनगुरकर दिग्दर्शित लघुपटांनी कळस चढवला आहे. परदेशातील उद्योजक फेड्री रिगन यांच्या वर्ल्ड ग्लोब संस्थेअंतर्गत येथील आशिष निनगुरकर दिग्दर्शित “नियम’ व “कुलूपबंद’ या दोन कोरोनाविषयक जनजागृती करणाऱ्या लघुपटांचा खास प्रीमियर व चर्चासत्र ऑनलाइन पद्धतीने पार पडले. या वेळी उपस्थित मराठी व परदेशी रसिकांनी या लघुपटांना प्रचंड दाद दिली व फिजिकल डिस्टन्स पाळण्याची शपथ घेतली.

जो हरहुन्नरी हाडाचा कलाकार असतो तो कधीच स्वस्थ बसत नाही. तो घरात राहून काही ना काहीतरी “क्रिएटिव्ह’ करत असतो. आशिषने घरात राहून कोरोनाविषयक सामाजिक संदेश देणाऱ्या “नियम’ व “कुलूपबंद” या लघुपटांची निर्मिती केली. अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ट सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटांची नोंद वर्ल्ड ग्लोब या संस्थेने घेतली व त्याचा अनोखा असा प्रीमियर मोठ्या दिमाखात पार पडला. आशिष स्वतःच लेखक असल्याने त्याने या दोन्ही लघुपटांची मांडणी अत्यंत नेटकी केली असून योग्य आशय मांडला आहे. हा लघुपट घरात चित्रित करण्यात आल्याने कुणीही शूटिंगसाठी घराबाहेर पडले नाही. एकत्र येण्याची नको घाई, पुन्हा हा जन्म नाही, नियम पाळा, कोरोना टाळा व बाहेरच्या जिल्ह्यातून घरी आल्यावर क्वाॅरंटाइन म्हणून “नियम’ पाळणे बंधनकारक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी फिजिकल डिस्टन्स ठेवून सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सुरक्षित अंतर पाळा, कोरोना संसर्ग टाळा असा अनमोल संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील कलाकाराने मांडला सामाजिक आशय
‘नियम’ व ‘कुलूपबंद’ या लघुपटांची निर्मिती काव्या ड्रीम मुव्हीजअंतर्गतकिरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर, स्वरूप कासार व अनुराग निनगुरकर यांच्या भूमिका आहेत. अभिषेक लगस यांनी या लघुपटांचे संकलन केले आहे. कॅमेरामन, संकल्पना, लेखन व दिग्दर्शन अशी चौफेर धुरा आशिष निनगुरकर यांनी सांभाळली आहे. “वर्क फ्रॉम होम’च्या काळात ग्रामीण भागातील या कलाकाराने घरात राहून सामाजिक आशय मांडणाऱ्याा लघुपटांना परदेशात गौरवण्यात आल्याने टीमचे सर्वत्र कौतुक होत आहे.

0