आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठक नाहीच:मंत्री अतुल सावे यांची स्पष्टोक्ती; बैठक असती तर तसे प्रस्ताव, चर्चाही झाली असती- शिरसाट

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये मंत्रीमंडळ बैठक होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अशी कुठलीही मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादमध्ये होणार नसल्याची माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलतांना दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकी संदर्भात अजून कुठलेही माहिती प्रशासनालाही देण्यात आली नाही असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

सहा वर्षांपासून बैठक रखडली

औरंगाबाद मध्ये मंत्रीमंडळ बैठक गेल्या सहा वर्षांपासून झालेली नाही. त्यामुळे नवीन सरकार मंत्रीमंडळ बैठक घेणार का या बाबत चर्चा सुरू होती. औरंगाबादमध्ये एकनाथ शिंदे आल्यानंतर 'दिव्य मराठी'ने याबाबत मंत्रीमंडळ बैठक घेणार का? याबाबत विचारले होते. त्यावर शिंदे यांनी याबाबत विचार करू असे सांगत त्यावर अधिक बोलणे टाळले होते.

मंत्रीमंडळ बैठक नाहीच

याबाबत बोलतांना सहकार मंत्री अतुल सावे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलतांना सांगितले की, औरंगाबाद मध्ये अश्या कुठलीही मंत्री मंडळ बैठक आयोजित केलेली नाही.सर्व मंत्री त्याच्या जिल्ह्यात ध्वजरोहणासाठी जाणार आहेत. त्यामुळे सध्या अश्या बैठकीचे कुठलेही नियोजन नसल्याचे त्यांनी सांगितले.

संजय शिरसाटांचीही स्पष्टोक्ती

आमदार संजय शिरसाट यांनी देखील दिव्य मराठीशी बोलताना सांगितले की, औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठक होणार नाही. तसे कुठलेही नियोजन नसल्याचे आमदार संजय शिरसाठ यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना स्पष्ट केले आहे.

तर प्रस्ताव, चर्चा झाल्या असत्या

गेल्या सहा वर्षापासून औरंगाबाद मध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली नाही. मंत्रीमंडळ बैठक असती तर तसे प्रस्ताव त्यावर चर्चाही झाल्या असत्या. मात्र, असे काहीही होणार नसल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी सांगितले. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयाला देखील या बैठकी बाबत काहीही कळवण्यात आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...