आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटनस्थळे अद्याप बंदच:पर्यटनस्थळे उघडण्याबाबत कुठलाही निर्णय झाला नाही; पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरेंचे स्पष्टीकरण

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अजिंठा, वेरूळ लेणींसह अन्य पर्यटनस्थळे उघडावीत, टुरिस्ट गाइड असोसिएशनची मागणी

सोमवारपासून राज्यातील धार्मिक स्थळे उघडली जात असली तरी पर्यटनस्थळे उघडण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. औरंगाबाद शहरातील टुरिस्ट गाइड असोसिएशनने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अजिंठा, वेरूळ लेणींसह अन्य पर्यटनस्थळे उघडली जावीत, अशी मागणी करणारे पत्र पाठवले. कारण अनेकांचे पोट यावर आहे. पर्यटनस्थळे उघडली गेली तर त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न सुटेल, अन्यथा त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, असा मुद्दाही या पत्राद्वारे असोसिएशनने सरकारकडे उपस्थित केला होता.

यासंदर्भात राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनाच आहेत. तेच याबाबत निर्णय घेतील, असे सांगतानाच सध्या तरी पर्यटनस्थळे उघडण्याबाबत कुठला निर्णय झाला नसल्याचेही त्या म्हणाल्या.

आता जिल्हा प्रशासन पाठवणार प्रस्ताव

औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले, पर्यटन क्षेत्रावर ज्यांची रोजीरोटी अवलंबून आहे, अशा विविध उद्योगातील अनेकांची मी भेट घेतली व चर्चाही केली. तेव्हा अनेक लोकांचे रोजगार गेले असून ते प्रचंड अडचणीत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनही जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उघडली जावीत, अशी मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...