आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा२००८-०९च्या आर्थिक संकटानंतर अमेरिकन लोकांचा उच्च शिक्षणावरील विश्वास कमी होऊ लागला. २०११ पर्यंत, अर्ध्याहून अधिक महाविद्यालयीन पदवीधर बेरोजगार होते किंवा त्यांच्याकडे योग्य नोकरी नव्हती. अर्थव्यवस्था रुळावर आल्यानंतर परिस्थिती बदलली होती. पण, महामारीच्या साथीने ते पुन्हा बदलले आहे. आता कॉलेजची पदवी ही लोकांची पहिली पसंती नाही.
थिंक टँक पॉपुलेसच्या २०१९च्या सर्व्हेनुसार, अमेरिकननी कॉलेजच्या तयारीला दहावी रँक दिली होती. संस्था दरवर्षी लोकांना विचारते, शिक्षणाचा उद्देश काय? लोकांना रँक देण्यास सांगितले जाते. २०२२मध्ये सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी ५७ बाबींमध्ये शिक्षणाला ४७वा क्रमांक दिला होता. सर्वेक्षण डेटा दर्शविते की लोक करिअर आणि उपयुक्त कामांना अधिक महत्त्व देतात.
गेल्या काही वर्षांत महाविद्यालयांतील प्रवेश कमी झाले आहेत. २००९ मध्ये हायस्कूलमधून निघालेल्या ७०% विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतला. २०२१मध्ये हा आकडा ६१.८ % इतका होता. हे १९९४च्या बरोबरीचे आहे. पॉपुलेसच्या अभ्यासात सलग चौथ्या वर्षी वित्त व्यवस्थापन, स्वयंपाकासारख्या व्यावहारिक कौशल्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे. उच्च श्रेणीतील इतर कार्यांमध्ये समस्या सोडवण्यासाठी विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता समाविष्ट आहे. पेनसिल्व्हेनिया राज्याने बहुतेक सरकारी नोकऱ्यांसाठी महाविद्यालयीन पदवीची आवश्यकता काढून टाकली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.