आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरी सुविधा मिळत नसल्याने त्रस्त:मनपा नको, सिडकोकडे सोपवा पायलटबाबानगरीचा कारभार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे अनेक वसाहती महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट होण्यासाठी धडपडत असतात. दुसरीकडे पायलटबाबानगरीच्या सुमारे ५०० कुटुंबांनी आम्हाला महापालिका नको.सिडकोकडे आमचा कारभार सोपवा, अशी मागणी केली आहे.पायलटबाबानगरी भूखंडधारक संघाचे अध्यक्ष शेषराव शिंदे, अॅड. कालिदास भिसे यांनी सिडकोच्या मुख्य प्रशासकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, २००६मध्ये मनपाने सिडकोसोबत आमच्यासह अनेक वसाहतींच्या सोयी-सुविधांचा करार केला. त्यानंतर आमची वसाहत मनपाच्या ताब्यात गेली.

पण रस्ते, ड्रेनेज, पाणी या मूलभूत सुविधांकडे महापालिका प्रशासनाने काहीही लक्ष दिले नाही. केवळ तुटपुंज्या रुपात काही रस्ते केले आहेत. या उलट अनधिकृत वसाहतींवर मात्र सुविधांचा वर्षाव करण्यात आला आहे. हा दुटप्पी भाव लक्षात घेता तातडीने मनपासोबतचा करार रद्द करून सिडकोतर्फे सोयी-सुविधा द्याव्यात. महिनाभरात निर्णय झाला नाही तर आंदोलन करू. न्यायालयात दाद मागू.

बातम्या आणखी आहेत...